शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळातील उद्याने उदंड, अवस्था बकालच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

शहराच्या विविध भागात एकूण २२ उद्याने आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजना आणि हरित पट्ट्याचा विकास, या योजनेतून काही उद्याने नगरपरिषदेने विकसित केली. काही उद्याने तत्कालीन पालकमंत्र्यांच्या विकास निधीतून सुशोभित करण्यात आली. आॅगस्ट २०१९ मध्ये उद्यानाच्या देखभाल व दुरुस्तीच्या जुन्या टेंडरची मुदत संपली. त्यानंतर उद्यानांच्या सुरक्षेसोबत विकासकामांचे नवीन टेंडर निघणे अपेक्षित होते. मात्र तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी टेंडर काढलेच नाही.

रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील आबालवृद्धांसाठी उद्यानांची निर्मिती करण्यात आली. मात्र आता याच उद्यानांत त्यांच्याऐवजी केवण प्रेमी युगल फिरताना दिसून येतात. टपोरींचे ठिय्ये दिसतात. सामान्य व सभ्य नागरिकांना या उद्यानांत दोन क्षण निवांत बसणे अवघड झाले आहे. विशेषता सायंकाळी तर भयावह अवस्था असते. रात्रीच्या अंधारात अनेक जोडपी, मद्यपी, व्यसनी या उद्यानांचा ताब घेतात. अनेक नको ते प्रकार तेथे सुरू असतात. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. परिणामी ही उद्याने बकाल आणि भकास झाली आहेत.शहराच्या विविध भागात एकूण २२ उद्याने आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजना आणि हरित पट्ट्याचा विकास, या योजनेतून काही उद्याने नगरपरिषदेने विकसित केली. काही उद्याने तत्कालीन पालकमंत्र्यांच्या विकास निधीतून सुशोभित करण्यात आली. आॅगस्ट २०१९ मध्ये उद्यानाच्या देखभाल व दुरुस्तीच्या जुन्या टेंडरची मुदत संपली. त्यानंतर उद्यानांच्या सुरक्षेसोबत विकासकामांचे नवीन टेंडर निघणे अपेक्षित होते. मात्र तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी टेंडर काढलेच नाही. त्यामुळे या उद्यानाच्या देखभालीसाठी असलेले जुने कामगार काम सोडून गेले. आता या ठिकाणी कुणाचाही पहारा नाही. परिणामी तार कंपाउंड जागोजागी तोडण्यात आले. आता उद्यानांत चक्क स्वैराचार सुरू झाला.शिवाजी गार्डनला दृष्ट लागली. तेथील उंच डेरेदार वृक्ष तोडण्यात आले. तेथील खेळणी तुटली. घसरगुंडीला खालचा पत्राच शिल्लक नाही. घोडागाडीच्या सिट्सच उरल्या. ट्रॅकवर मोकाट जनावरांच्या विष्टा साचल्या. झाडांना पाणी नाही. तेथील ट्रेन पूर्णत: जीर्ण झाली. विहिरीतील पाण्याला शेवाळ लागले. एकूणच उद्यान भकास झाले आहे.आझाद मैदानातील नेहरू उद्यानाची अवस्था यापेक्षाही वाईट आहे. तेथे कचºयाचे ढीग साचले. बाहेर बंदचे बोर्ड लागले. मात्र आत दारूच्या बॉटल, दारू पाऊच, प्लास्टिक ग्लास यांचा खच दिसतो. नवीन खेळणी उद्घाटनापूर्वीच तुटली. अभिनव कॉलनीतील छत्रपती मैदानाची अवस्थाही तशीच. अतिशय देखणे असलेल्या या मैदानाला सुरक्षेचे ग्रहण लागले. तेथे विद्यार्थी जोडपे पहायाला मिळतात. जिमचे साहित्य तुटले. पत्रकार कॉलनीतील उद्यानाची अवस्था न सांगितलेलीच बरी. तेथे हिरवळ नावालाही दिसत नाही.शिवाजी मैदानात सकाळपासून आबालवृद्धांची गर्दी होते. मात्र सुरक्षा भींत एका ठिकाणी खचली. सावरकर मैदानाची अवस्था बिकटच आहे.धावपळीच्या जीवनातून दोन क्षण विश्रांती काढून निवांत बसावे म्हणून यवतमाळ शहरात उद्यानांची निर्मिती केली गेली. त्यावर कोट्यवधींचा खर्च केला गेला. सध्या उद्यानांकडे बघितल्यास भयावह अवस्था दिसून येते. सर्वच उद्याने भकास आणि बकाल झालेली दिसून येतात. शहरातील २२ उद्यानांची गत दयनीय झाली आहे. बहुतांश उद्यानांमध्ये दोन क्षण विश्रांती घेणेही दुरापास्त झाले आहे. सभ्य आणि सामान्य नागरिकांना या उद्यानांमध्ये जाणे अवघड झाल्याचे दिसत आहे.पालकांनो सावधान...आपली मुले चांगली आहे. ती कुणाच्याही फ ंदात पडत नाही. या गैरसमजात राहू नका. शिकवणीच्या नावाखाली विद्यार्थी अशा बगिच्यांमध्ये बसलेले असतात. फोनवर बोलतात. नको तो प्रकार करतात. त्यामुळे पालकांनी सावध होण्याची गरज आहे.बीओटी तत्वावर उद्याने देण्यात यावी, असा प्रस्ताव सभागृहात आला. त्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू झाल्या नाहीत. यापूर्वीही निविदा काढण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या. मात्र निविदा निघाल्या नाही.कांचन चौधरीनगराध्यक्ष, यवतमाळउद्याने बकाल झाली. त्याचे सौंदर्यीकरण करावे. तत्काळ निविदा काढून देखभाल, दुरुस्तीचे काम सुरू करावे.- चंद्रशेखर चौधरीविरोधी पक्षनेते, नगरपरिषद यवतमाळदामिनी पथक गेले कुठे?रोडरोमियोवर वचक ठेवण्यासाठी दामिनी पथक आहे. मात्र अनेक प्रेमी युगल या उद्यानात नको ते करीत असताना हे पथक जाते कुठे, असा प्रश्न आहे. सार्वजनिक स्थळी हा प्रकार थांबावा म्हणून दामिनी पथकाने अशांवर कारवाई करण्याची अपेक्षा आहे.