गुंज येथील उपोषणाची कामगार सहआयुक्तांकडून दखल
By Admin | Updated: October 17, 2016 01:46 IST2016-10-17T01:46:46+5:302016-10-17T01:46:46+5:30
थकीत वेतनासाठी गत महिनाभरापासून उपोषणाला बसलेले साखर कामगारांच्या उपोषणाची दखल अमरावती येथील कामगार सहआयुक्तांकडून घेण्यात आली असून

गुंज येथील उपोषणाची कामगार सहआयुक्तांकडून दखल
प्रहारचा पुढाकार : अवसायक आणि नॅचरल शुगरला नोटीस
महागाव : थकीत वेतनासाठी गत महिनाभरापासून उपोषणाला बसलेले साखर कामगारांच्या उपोषणाची दखल अमरावती येथील कामगार सहआयुक्तांकडून घेण्यात आली असून कारखान्याचे अवसायक आणि नॅचरल शुगर कंपनीच्या संचालकांना नोटीस बजावली आहे.
सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना नॅचरल शुगर कंपनीने विकत घेतला. त्यावेळी ४३ कोटी ९५ लाख रुपयांचा बँकेत भरणा केला. परंतु कामगारांचे पैसे अद्यापही मिळाले नाही. यासाठी कामगारांनी कारखान्यासमोर उपोषणाला प्रारंभ केला. परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर प्रहार संघटनेने या उपोषणाची दखल घेतली. आंदोलनाचा इशारा दिला. अखेर कामगार सहआयुक्तांनी सुधाकरराव नाईक साखर कारखान्याचे अवसायक, वारणा समूह आणि नॅचरल शुगर कंपनीला नोटीस बजावून १९ तारखेला हजर राहण्याचे आदेश दिले. कारखाना अवसायनात निघाल्यानंतर राज्य बँकेने कारखाना विकला. त्यावेळी कामगारांचे पगार, ग्रॅज्युएटीची रक्कम तशीच राहिली. नॅचरल शुगरने बँकेच्या अटीची पूर्तता करण्याचा करार केला. त्यामध्ये कामगारांचे देणे सर्व मिळून दहा कोटींच्या जवळपास नमूद केले. परंतु अद्यापही या कामगारांचे पैसे दिले नाही. आता कामगार सहआयुक्त काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)