शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

  विवाहितेवर सामूहिक अत्याचार; सर्व आरोपींना अटक

By रवींद्र चांदेकर | Updated: May 19, 2023 18:53 IST

दारव्हा तालुक्यातील एका गावात सहाजणांनी विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला. ही घटना ११ मे रोजी घडली. या घटनेतील सर्व सहाही आरोपींना लाडखेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

रवींद्र चांदेकर

यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील एका गावात सहाजणांनी विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला. ही घटना ११ मे रोजी घडली. या घटनेतील सर्व सहाही आरोपींना लाडखेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

लाडखेड पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात ३५ वर्षीय विवाहित महिला पती आणि दोन मुलांसह वास्तव्याला आहे. विवाहितेचे पती मागील तीन वर्षांपासून एका शेतकऱ्याचे १२ एकर शेत मक्त्याने करतात. विवाहिता शेतमजुरीची कामे करते. ११ मे रोजी सकाळी ९:०० वाजताच्या सुमारास विवाहिता पतीने मक्त्याने केलेल्या शेतात कामासाठी गेली होती. दुपारी  १:०० वाजताच्या सुमारास गजानन रामराव लव्हाळे (४०), पंजाब केशव सोनपिपरे (४०), विठ्ठल रामराव लव्हाळे (३५), विनायक गोविंदा वासनिक (५०), राजू दादाराव घुगे (३०) आणि राहुल रमेश जायभाये (२५) हे सर्व तिच्या शेतामध्ये गेेले. त्यापैकी गजानन लव्हाळे याने विवाहितेला उचलून शेताच्या धुऱ्यावर नेले. त्याच्या मागे इतर पाच आरोपी होते. गजाननने धुऱ्यावरील नालीमध्ये नेवून तिच्यावर जबरीने अत्याचार केला. 

विवाहितेने स्वत:ला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तिची शक्ती कमी पडली. त्यानंतर इतर पाचजणांनीही तिच्यावर आळीपाळीने जबरीने अत्याचार केला. घडलेली घटना कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यातून सावरत विवाहिता कशीबशी घरी परतली. तिने चक्क चार दिवस या घटनेची वाच्यता केली नाही. मात्र, पतीने धीर दिल्याने तिने अखेरीस १८ मे रोजी लाडखेड पोलिस ठाणे गाठून सहाजणांविरूद्ध अत्याचार केल्याची तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सहाही जणांविरूद्ध भादंवि ३७६ (डी), ५०६ आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ च्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. 

लाडखेडचे ठाणेदार रामकृष्ण भाकडे यांनी त्वरित गुन्हा दाखल करून सहाही आरोपींना अटक केली. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. एसडीपीओंनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना विविध सूचना दिल्या. ठाणेदार रामकृष्ण भाकडे, मोरेश्वर सावदे, उमेश शर्मा आणि पोलिस पथक उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी