दारव्ह्यात मनोरंजन केंद्राच्या नावावर भरतो जुगार

By Admin | Updated: May 25, 2015 02:27 IST2015-05-25T02:27:48+5:302015-05-25T02:27:48+5:30

शहरात अनेक भागामध्ये मनोरंजन केंद्राच्या नावावर जुगार भरविण्यात येत आहे.

Gambling in the name of entertainment center in Durban | दारव्ह्यात मनोरंजन केंद्राच्या नावावर भरतो जुगार

दारव्ह्यात मनोरंजन केंद्राच्या नावावर भरतो जुगार

दारव्हा : शहरात अनेक भागामध्ये मनोरंजन केंद्राच्या नावावर जुगार भरविण्यात येत आहे. हातभट्टीची दारू विक्रीचा व्यवसाय जोरात आहे. मोबाईल मटका यासह सर्व प्रकारचे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहे.
येथील वर्षा टॉकीजलगतच्या कॉम्प्लेक्समध्ये मनोरंजन केंद्र असून, येथे दिवसभर जुगार सुरू असतो. कारंजा मार्गावरील एका शेतात जुगार चालू आहे. हातभट्टी व्यावसायिकांनी परवानाप्राप्त दुकानासारखाच दारुविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. या व्यवसायात कुप्रसिद्ध असलेले गवळीपुरा व बाराभाई मोहल्ल्यातील दोन व्यावसायिकांचा चांगलाच बोलबाला आहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर गोळीबार चौक परिसरात मटकापट्टी घेणाऱ्यांचा वावर असतो. सध्य मटका व्यवसाय हायटेक झाला असून, या धंद्यात विश्वासू गिऱ्हाईकांचे मोबाईलवरून आकडे लावून घेतले जातात. या सर्व प्रकाराला पोलीस ठाण्यात कार्यरत एका तरूण जमादाराचा वरदहस्त असल्याचे दिसते. ठाणेदाराच्या सुस्वाभावाचा फायदा घेऊन सदर जमादाराने अवैध धंदे सुरू करण्यासाठी मूकसंमती दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gambling in the name of entertainment center in Durban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.