विजय दर्डा यांच्या विकास निधीतून गहुली हेटीत रस्ता
By Admin | Updated: December 20, 2014 02:09 IST2014-12-20T02:09:05+5:302014-12-20T02:09:05+5:30
लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या विकास निधीतून बांधण्यात येणाऱ्या यवतमाळ तालुक्यातील गहुली हेटी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी करण्यात आले.

विजय दर्डा यांच्या विकास निधीतून गहुली हेटीत रस्ता
यवतमाळ : लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या विकास निधीतून बांधण्यात येणाऱ्या यवतमाळ तालुक्यातील गहुली हेटी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी करण्यात आले. लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी भूमिपूजन केले.
यवतमाळ शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गहुली हेटी येथे रस्त्यांची दैनावस्था झाली होती. त्यामुळे येथील गावकऱ्यांनी खासदार विजय दर्डा यांच्याकडे रस्ता तयार करण्यासाठी निधीची मागणी केली. खासदार दर्डा यांनी कुठलाही विलंब न लावता या कामासाठी १५ लाख रुपये मंजूर केले. या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
हा रस्ता लवकरच तयार होणर असून गावकऱ्यांची अडचण दूर होणार आहे. समारंभाला गहुली हेटीचे सरपंच संदेश राठोड, काँग्रेसचे सरचिटणीस विलास देशपांडे, ग्रामपंचायत सदस्य अश्विन राठोड, अजय तातड, राजेश ठाकरे, मनोज देशपांडे, अतुल भुराणे, सुदाम राठोड, विनोद राठोड, श्रीराम चव्हाण, श्रावण राठोड, केशर चव्हाण, तुकाराम चव्हाण, लक्ष्मण राठोड, अनिल राठोड, दिलीप राठोड, काशीनाथ राठोड, भीमदेव चव्हाण, मनोहर चव्हाण, लच्छीराम जाधव, श्रीकृष्ण चव्हाण, जयदेव राठोड यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
(शहर वार्ताहर)