भविष्यात डॉक्टरांची जबाबदारी वाढणार

By Admin | Updated: June 2, 2015 00:15 IST2015-06-02T00:15:17+5:302015-06-02T00:15:17+5:30

मेडिकलच्या अ‍ॅडमिशन महाग झाल्या, त्यासोबतच डॉक्टरी पेशाही दिवसेंदिवस महाग होत आहे.

Future doctor's responsibilities will be increased | भविष्यात डॉक्टरांची जबाबदारी वाढणार

भविष्यात डॉक्टरांची जबाबदारी वाढणार

विजय दर्डा : दृष्टी आय केअरमधील अत्याधुनिक यंत्रांचे उद्घाटन
यवतमाळ : मेडिकलच्या अ‍ॅडमिशन महाग झाल्या, त्यासोबतच डॉक्टरी पेशाही दिवसेंदिवस महाग होत आहे. डॉक्टर व रुग्ण यांचे नाते विश्वासाचे आहे. समाजात डॉक्टरांचे योगदानही मोठे आहे. त्यामुळे डॉक्टरांनी नैतिकतेने प्रॅक्टीस करावी, कारण भविष्यात त्यांची जबाबदारी वाढणार आहे, असे प्रतिपादन लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केले आहे.
धामणगाव रोड स्थित डॉ. सुबोध पुरोहित यांच्या दृष्टी आय केअरमधील अत्याधुनिक उपकरणांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ.टी.सी. राठोड, जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप देशमुख, गोपाल पुरोहित उपस्थित होते. विजय दर्डा म्हणाले, मानवी जीवनात संस्कार महत्वाचे आहे. या संस्कारामुळेच वैद्यकीय क्षेत्रातील कमिशन पॅटर्न बंद होईल, डॉक्टरांमध्ये नैतिकतेच्या दृष्टीने बदल होईल, असा विश्वास वाटतो. या वैद्यकीय व्यवसायात डॉक्टरांनी स्वस्तात दर्जेदार सेवा देणे अपेक्षित आहे. पूर्वी डॉक्टरांना नाडी पाहून निदान करावे लागत होते. मात्र आता तंत्रज्ञानामुळे शरीराच्या प्रत्येक भागाचे सूक्ष्म निरीक्षण करणे शक्य झाले आहे. त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे. विदेशात शिक्षण घेऊनही डॉ. सुबोध पुरोहित व शालिनी पुरोहित यांनी वैद्यकीय व्यवसायासाठी यवतमाळची निवड केल्याने विजय दर्डा यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. दृष्टी आय केअरमध्ये अत्याधुनिक यंत्रे उपलब्ध झाल्याने आता डोळ्यांच्या विविध आजारांचे वेळीच निदान व उपचार होणे शक्य होणार आहे. त्यासाठी आता रुग्णांना दुसऱ्या प्रांतात अथवा जिल्ह्यात जाण्याची गरज राहणार नसल्याचे दर्डा यांनी सांगितले. या प्रसंगी डॉ.टी.सी. राठोड यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात डॉ. सुबोध पुरोहित म्हणाले, दृष्टी आय केअरने सुरुवातीपासून अत्याधुनिक तंत्रज्ञान व औषधींवर भर दिला आहे. मधुमेह ही गंभीर समस्या असून त्यामुळे शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम होतो. सन २०२५ मध्ये देशातील मधुमेही रुग्णांची संख्या पाच कोटी ७० लाख एवढी होणार आहे. अत्याधुनिक मशीनमुळे डोळ्यांच्या प्रत्येक आजाराचे नेमके निदान शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विजय दर्डा यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, अ‍ॅड. आर.के. मनक्षे, डॉ. सुनील अग्रवाल, डॉ. सी.बी. अग्रवाल, डॉ. दीपक सव्वालाखे, डॉ. ललित निमोदिया, संतोष भूत, डॉ. विजय अग्रवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Future doctor's responsibilities will be increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.