लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: कोरोनामुक्त झालेल्या चिमुकल्या बाळाला त्याची आई दवाखान्यातून जेव्हा घेऊन घरी आली तेव्हा त्यांच्या स्वागताला पोलिस दल हजर झाले होते. पोलिस अधिकारी एसडीपीओ माधुरी बाविस्कर यांनी बाळाला जवळ घेऊन त्याचे कौतुक केले व त्याच्या आईचे अभिनंदन केले. यावेळी पोलिसांनी टाळ्या वाजवून या दोघांचे स्वागत केले.जिल्ह्यात आता एक्टिव पॉझिटिव्हची संख्या ४५ वरून ६ वर आली आहे. विशेष म्हणजे २४, २५5 आणि२६ एप्रिल या दरम्यान सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडली. त्यानंतर रुग्ण वाढीचा वेग कमी झाला असला तरी एक-दोन, एक-दोन पॉझिटिव्ह रुग्ण येणे सुरू होते. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण आकडा पाहता पाहता ९८ वर गेला होता. यापैकी तब्बल ९१ जणांना बरे करण्यात आरोग्य विभागाला लक्षणीय यश आले आहे.यवतमाळ जिल्ह्यसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी असून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्व जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.
कोरोनामुक्त झालेल्या चिमुकल्या भावी नागरिकाचे पोलिसदलातर्फे स्वागत; यवतमाळ येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 21:19 IST