शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

यवतमाळ आगारावर एसटी कामगारांचा रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 22:15 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारातील कारभाराविषयी कामगारांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. कामगारांचे प्रश्न प्रलंबित ठेवण्यासोबतच विविध विषयांची सोडवणूक होत नसल्याने अखेर यवतमाळ आगार संयुक्त कृती समितीने १६ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देउपोषणाचा इशारा : कामगार संघटनांची संयुक्त कृती समिती संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारातील कारभाराविषयी कामगारांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. कामगारांचे प्रश्न प्रलंबित ठेवण्यासोबतच विविध विषयांची सोडवणूक होत नसल्याने अखेर यवतमाळ आगार संयुक्त कृती समितीने १६ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.आगारातील वाहनांची स्थिती अतिशय दयनीय आहे. वाहनात नियमानुसार आवश्यक साहित्य उपलब्ध राहात नाही. परिणामी मार्गात प्रवासी आणि चालक-वाहकांची गैरसोय होते. ड्यूटी अलोकेशनमध्ये मनमानी सुरू आहे. मर्जीतील मोजक्याच वाहतूक नियंत्रकांना नियमबाह्य पद्धतीने कामगिरी दिली जाते. इटीआय मशीन चार्जींग न करता वाहकांना दिल्या जातात. मार्गावर मशीन बिघडण्याचे प्रकार वाढले. याचा त्रास वाहकांना होतो.आगारात चालक-वाहकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नाही. परिणामी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका बडतर्फ चालकाचा आगारात हस्तक्षेप वाढला आहे. अलोकेशनमध्ये बसून कामगिरी लावून घेण्यापर्यंत त्यांचा हस्तक्षेप सुरू आहे. रजा नोंद रजिस्टर आगार व्यवस्थापकांच्या ताब्यात आहे. त्यावर प्रथम सात रकाने रिक्त ठेऊन त्यानंतर आलेल्या अर्जाच्या नोंदी घेतल्या जातात. वास्तविक आगारात एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी नियमित रजेवर नसताना या रकान्यामुळे कर्मचाऱ्यांचे अर्ज रजा कोट्याबाहेर दर्शवून नामंजूर केले जात असल्याचा आरोप आहे.रात्रवस्तीस फेºया घेऊन जाणाºया चालक-वाहकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाही. सोयी नसलेल्या ठिकाणी फेºया पाठवू नये, असे कामगारांचे मत आहे. मर्जीतील वाहतूक नियंत्रकांना एकच एक कामगिरी अलोकेशनला दिली जाते. इतर वाहतूक नियंत्रकांना चक्रकामगिरीच्या नावाखाली इतरत्र कामगिरी करायला सांगितले जाते. यामुळे याविषयी कामगारांमध्ये नाराजीचा सूर आहे. यासंदर्भात एसटी कामगार संघटना, राष्ट्रीय मोटार कामगार युनियन, कास्ट्राईब राज्य कर्मचारी संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), चालक-वाहक, यांत्रिक कामगार संघटना यवतमाळ आगाराने उपोषणाचा इशारा दिला आहे.फिक्स ड्यूट्यांच्या नावाखाली मनमानीफिक्स ड्यूटीच्या नावाखाली यवतमाळ आगारात मनमानी कारभार सुरू आहे. काही विशिष्ट लोकांना सवलती देऊन इतरांना मात्र जाणीवपूर्वक फेरफार करून त्रास दिला जातो. चांगले उत्पन्न देणाºया चालक-वाहकांवरही अविश्वास दाखवून फिक्स ड्यूटीच्या नावाखाली इतरत्र कामगिरी देऊन त्रास दिला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :state transportएसटी