रमाई आवासच्या लाभार्थ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 20:55 IST2017-08-30T20:55:23+5:302017-08-30T20:55:40+5:30

रमाई आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी येथील नगरपरिषदेसमोर उपोषण केले.

Fury of beneficiaries of Ramai Housing | रमाई आवासच्या लाभार्थ्यांचे उपोषण

रमाई आवासच्या लाभार्थ्यांचे उपोषण

ठळक मुद्देरमाई आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी येथील नगरपरिषदेसमोर उपोषण केले.

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रमाई आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी येथील नगरपरिषदेसमोर उपोषण केले. गुरुदेव युवा संघाच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करून जिल्हाधिकारी, समाज कल्याण अधिकारी आणि मुख्याधिकाºयांना निवेदन दिले.
रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी नगरपरिषदेने अर्ज मागितले होते. घरकूल मंजूर झाले असले तरी अद्यापही पालिकेकडून धनादेश मिळाला नाही. तसेच मागील सात वर्षांपासून एपीएल अंतर्गत ४३८ नागरिकांनी अर्ज सादर केले होते. याचाही सर्वे संबंधित विभागाकडून झाला नाही. आज या नागरिकांना कुडाच्या घरात राहावे लागत आहे. पावसाळ्यात घराला गळती लागते. हिवाळ्यात थंडीचा मारा बसतो. या समस्येतून बाहेर निघण्यासाठी घरकूल योजनेचे धनादेश मिळावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
निवेदन देताना गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम, सचिव चंद्रभागा गेडाम, रिना कांबळे, यशोदा मेश्राम, नलिनी नरगडे, शालिनी नरगडे, संगीता ससाने, चंदा देशपांडे, सुनीता किन्हेकार, देवका चंदेल, माधुरी मंगले, अर्चना मुंगळे, ज्योती कसारे, अंजू कलोसिया, आकाश मुंगले, मुक्ता चवरे, यशोदा गेडाम, प्रतिभा गेडाम, शारदा अंबादे, शशीकला पवार, महेश गेडाम, अनिता किन्नाके, राजू गेडाम, रमेश गुरुनुले आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

Web Title: Fury of beneficiaries of Ramai Housing