दारुच्या बाटलीची प्रेतयात्रा

By Admin | Updated: June 9, 2015 01:15 IST2015-06-09T01:15:17+5:302015-06-09T01:15:17+5:30

संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी करावी या मागणीसाठी सोमवारी आर्णी तहसीलवर काढण्यात आलेल्या मोर्चातील दारूच्या बाटलीची

The funeral of the bottle of alcohol | दारुच्या बाटलीची प्रेतयात्रा

दारुच्या बाटलीची प्रेतयात्रा

आर्णीत दारूबंदीसाठी मोर्चा : महिला व पुरुषांची लक्षणीय उपस्थिती
आर्णी : संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी करावी या मागणीसाठी सोमवारी आर्णी तहसीलवर काढण्यात आलेल्या मोर्चातील दारूच्या बाटलीची प्रेतयात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या मोर्चात तालुक्यातील शेकडो महिला व पुरुष सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी एक निवेदन तहसीलदारांना सादर केले.
जिल्ह्यात दारुबंदी करावी या मागणीसाठी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरुन मोर्चाला सोमवारी प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गांनी फिरुन हा मोर्चा तहसीलवर पोहोचला. या मोर्चात आमदार राजू तोडसाम यांनी उपस्थित राहून दारूबंदीला पाठिंबा जाहीर केला.
मोर्चाचे नेतृत्व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य पूजा मुनगीनवार, संगीता पवार, श्रीकांत मुनगीनवार, गीता सनसेटवार, उमेश मेश्राम आणि दाभडी येथील दारूबंदी पथकाच्या महिलांनी केले. या मोर्चात दारूच्या बाटलीची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. महिलांनी दारूबंदीसाठी विविध घोषणा दिल्या.
मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी सभेत रुपांतरित झाला. यावेळी आमदार राजू तोडसाम, पूजा मुनगीनवार, संगीता जाधव, उमेश मेश्राम, श्रीकांत मुनगीनवार यांनी मार्गदर्शन केले.
मोर्चात प्रवीण मुनगीनवार, विजय ढाले, निता ठाकरे, रेखा ढाले, प्रा.विनीत माहुरे, प्रा.मादेशवार यांच्यासह परिसरातील शेकडो महिला व पुरुष सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The funeral of the bottle of alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.