शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निधीच दिला नाही; ‘सरसकट सर्व मुलांना गणवेश’ मिळणार तरी कसा?

By अविनाश साबापुरे | Updated: June 17, 2023 05:54 IST

दारिद्र्य रेषेवरील मुलांना लाभ नाही : मार्च महिन्यात झाली अर्थसंकल्पात घोषणा, जूनमध्ये प्रशासनाकडून बगल

अविनाश साबापुरे

लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: राज्यातील शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जाईल, अशी घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मात्र, समग्र शिक्षा अभियानातून मोफत गणवेशाचा निधी शाळांना देताना तो बीपीएल व इतर वर्गवारीतील मुलांसाठीच देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्णयाला प्रशासनाकडून बगल दिली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी जिल्हा परिषद, नगरपरिषद, महापालिकांच्या शाळा, अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. परंतु, हा लाभ केवळ सर्व वर्गवारीतील मुली, अनुसूचित जाती-जमातीची मुले आणि दारिद्र्यरेषेखालील मुले यांनाच दिला जातो. जी मुले दारिद्र्यरेषेच्या (बीपीएल) वर्गवारीत येत नाही, त्यांना मोफत गणवेश दिला जात नाही. मात्र यंदा महाराष्ट्र शासनाने अशा कोणत्याही वर्गवारीत न मोडणाऱ्या मुलांनाही मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेतला होता. १५ जूनपासून महाराष्ट्रातील शाळा सुरू झाल्यानंतरही सर्व मुलांना गणवेश मिळालेले नाहीत. गणवेश शाळांमधून दिले जाणार की, पालकांनी ते विकत घ्यायचे आहेत, याबाबत संभ्रम अजूनही कायम आहे.

दुसऱ्या गणवेशाची तर बातच नाही!

मोफत गणवेशाच्या निधीबाबत भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळाने २४ एप्रिल रोजी मान्यता दिली. त्यात महाराष्ट्रातील ३७ लाख ३८ हजार १३१ विद्यार्थ्यांना दोन गणवेश पुरविता यावे, याकरिता २२४ कोटी २८ लाख ६९ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. प्रत्यक्षात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने प्रति लाभार्थी ३०० याप्रमाणे अर्धाच निधी जिल्हास्तरावर वर्ग केला आहे. 

यातून शाळा व्यवस्थापन समित्यांनी एक गणवेश विद्यार्थ्यांना द्यायचा आहे, तर उर्वरित दुसरा गणवेश राज्य शासनाच्या स्तरावरून दिला जाणार आहे. मात्र शाळा सुरू होऊन दोन दिवस लोटल्यानंतरही दुसऱ्या गणवेशाचा पत्ता नाही. शिवाय हा दुसरा गणवेश बीपीएलवरील विद्यार्थ्यांना मिळणार का, याबाबतही स्पष्टता नाही.

तूर्त या मुलांच्या गणवेशासाठी निधी

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून तूर्त एकाच गणवेशासाठी जिल्हास्तरावर निधी वळता करण्यात आला आहे. त्यातून पहिली ते आठवीच्या मुली, अनुसूचित जातीची मुले, अनुसूचित जमातीची मुले आणि बीपीएलखालील मुले यांनाच गणवेश देण्याच्या सूचना परिषदेचे प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी निर्गमित केल्या आहेत. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीYavatmalयवतमाळ