स्वातंत्र्य, समता, बंधुता ही बुद्ध तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे

By Admin | Updated: April 10, 2015 00:13 IST2015-04-10T00:13:55+5:302015-04-10T00:13:55+5:30

मानव हा धर्मासाठी नाही. स्वातंत्र्य, समता, बुधंता ही बुद्ध तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. इसादास भडके यांनी केले.

Fundamentals of Buddha philosophy are freedom, equality and brotherhood | स्वातंत्र्य, समता, बंधुता ही बुद्ध तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे

स्वातंत्र्य, समता, बंधुता ही बुद्ध तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे

पुसद : कोणताही धर्म हा मानवाच्या कल्याणासाठी आहे. मानव हा धर्मासाठी नाही. स्वातंत्र्य, समता, बुधंता ही बुद्ध तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. इसादास भडके यांनी केले. ते गुरुवारी धम्मक्रांती प्रज्ञापर्वाच्या द्वितीय पुष्प गुंफताना बोलत होते.
महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने गुरुवारी दुसऱ्या दिवशी ‘मी धम्ममार्गी का झालो’ या विषयावर आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक चळवळीचे नेते अ‍ॅड. आप्पाराव मैंद होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कादंबरीकार संतोष पवार, ज्ञानेश्वर तडसे, आशाताई चापके, आशाताई कदम, नितीन पवार, दिनकर गोस्वामी, प्रा. हसनैन खान, गोवर्धन मोहिते, विकास जामकर, प्रा.डॉ. वंदना फुंडकर, अण्णा दोडके, सूर्यभान कांबळे आदींची उपस्थिती होती. यावेळी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने प्रबोधनपर नाटिकाही सादर करण्यात आली. पुढे बोलताना प्रा. इसादास भडके म्हणाले, आज मानवी हक्काचे जे आंतरराष्ट्रीय मानक ठरले आहे, विविध देशांच्या राज्य घटनांमध्ये ज्या मानवतावादी गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला, त्या सगळ्या जीवनमूल्यांचा समावेश फ्रेंच राज्यक्रांतीच्या कितीतरी आधी बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये केलेला आढळतो. जगात हिंसाचाराचा जो भयावह प्रकार सुरू आहे, त्याला केवळ बौद्ध तत्त्वज्ञानानेच थांबविता येऊ शकते. यावेळी उपस्थित इतर मान्यवरांनीसुद्धा विचार व्यक्त केले. प्रज्ञापर्व आयोजन समितीचे अध्यक्ष शीतलकुमार वानखडे, किशोर मुजमुले, गौतम सूर्यवंशी, अ‍ॅड. वाय.एन. जांभुळकर, मिलिंद हाटेकर, मनोज खिराडे, भीमराव उमरे, सुभाष गायकवाड, नारायण ठोके, मिलिंद सुरडकर, शशांक भरणे, बाळासाहेब कांबळे, जगदीश सावळे, आनंद नरवाडे, मंदा डांगरे, संघपाल आडोळे, विलास भवरे, प्रा. महेश हंबर्डे, भगवान हनवते, प्रा. दादाराव अगमे, शरद टेंबरे, संतोष गायकवाड, किशोर मनवर, अशोक वाहुळे, आर.एस. रायबोले, राजेंद्र वाघमारे आदींसह असंख्य नागरिकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Fundamentals of Buddha philosophy are freedom, equality and brotherhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.