मागासवर्ग विकास महामंडळ व खादी ग्रामोद्योगला निधी

By Admin | Updated: February 4, 2016 02:34 IST2016-02-04T02:34:12+5:302016-02-04T02:34:12+5:30

केंद्र शासनाकडून सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी विशेष केंद्रीय सहाय्यांतर्गत पहिला हप्ता ३१ कोटी ६१ लाख २० हजार रुपयांचा प्राप्त झालेला आहे.

Fund for Backward Development Development Board and Khadi Village Industries | मागासवर्ग विकास महामंडळ व खादी ग्रामोद्योगला निधी

मागासवर्ग विकास महामंडळ व खादी ग्रामोद्योगला निधी

यवतमाळ : केंद्र शासनाकडून सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी विशेष केंद्रीय सहाय्यांतर्गत पहिला हप्ता ३१ कोटी ६१ लाख २० हजार रुपयांचा प्राप्त झालेला आहे. त्यापैकी २१ कोटी रुपये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिपत्याखालील येणाऱ्या मागासवर्ग विकास महामंडळ, खादी व ग्रामोद्योग महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.
सन २०१४-१५ मध्ये केंद्र शासनाकडून वितरीत करण्यात आलेला ३० कोटी दहा लाख सात हजार रुपये इतका निधी सबंधित महामंडळांना वितरीत करण्यात आला आहे. सदर निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र केंद्र शासनास सादर करण्यात आले आहे. आता केंद्राचा ५५ कोटी ३६ लाख ९६ हजार रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी पहिला हप्ता ३१ कोटी ६१ लाख २० हजार रुपयांचा पहिला हप्ता शासनास प्राप्त झाला आहे. विशेष केंद्रीय सहाय्यअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना अनुदान स्वरुपात देण्यासाठी व प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी, महामंडळांनी केलेली मागणी विचारात घेऊन २१ कोटी रुपये महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांना मंजूर करण्यात आले आहे.
हा निधी खर्च करण्यासाठी शासनाने निकष ठरवून दिले आहे. या निकषाच्या अधिन राहूनच आवश्यक घटकांसाठी हा निधी खर्च करायचा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fund for Backward Development Development Board and Khadi Village Industries