फुलशेतीने शेतकऱ्यांना केले निराश
By Admin | Updated: November 7, 2016 01:07 IST2016-11-07T01:07:23+5:302016-11-07T01:07:23+5:30
दसरा-दिवाळीत झेंडूच्या फुलांना शहरी व ग्रामीण भागात मोठी मागणी असते. त्यामुळे फुलशेती केल्यास चांगला भाव

फुलशेतीने शेतकऱ्यांना केले निराश
सणासुदीत भाव गडगडले : परप्रांतातील फुलांची आवक वाढल्याने शेतकरी हतबल
पुसद : दसरा-दिवाळीत झेंडूच्या फुलांना शहरी व ग्रामीण भागात मोठी मागणी असते. त्यामुळे फुलशेती केल्यास चांगला भाव मिळेल या आशेवर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली होती. परंतु या दोन्ही सणांच्या काळात बाजारात झेंडूची प्रचंड प्रमाणात आवक झाल्याने फुलांचे दर कोसळले. परिणामी शेतकऱ्यांची निराशा झाली.
दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. वेगवेगळे दुकानांची यंदा नव्याने भर पडली. या काळात पूजा, उत्सवानिमित्त झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने झेंडूची लागवड केली आहे. परंतु फुलांच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. पुसद परिसरात अनेक शेतकऱ्यांनी यंदा फुलशेती केली होती. दसरा सणाला झेंडू फुलाचे दर अक्षरश: ५० ते १० रुपये किलो प्रमाणे विक्री करावी लागली. दसऱ्याच्या दिवशी तर आवक वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची फुले अक्षरश: रस्त्यावर फेकली होती. दिवाळीच्या सणातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. दिवाळीच्या आठवडाभरात सुरुवातीला १० ते १५ प्रति किलो भाव मिळाला. मात्र पुन्हा दरात घसरण व आवक झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांना ४ ते ५ रुपये प्रति किलोप्रमाणे विक्री करावी लागली. त्यामुळे फुलशेती संकटात सापडली आहे. यंदा या दोन्ही सणांच्या काळात फुलशेत उत्पादकांचे दिवाळी निघाले. पुढील वर्षी फुलशेती करण्याबाबत फेरविचार करावा लागणार असल्याचे अनेकांना बोलून दाखवले आहे. (तालुका प्रतिनिधी)