बसस्थानकात फिजिकल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:00 IST2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:00:20+5:30

जिल्ह्यात काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. खुद्द यवतमाळ शहरातही मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे एसटी महामंडळाला केवळ ५० टक्के प्रवास वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. एसटीने प्रवास करताना अगोदर वाहकाजवळ प्रवाशांना आपली नावे नोंदवावी लागतात.

Fudge of physical distance at the bus stand | बसस्थानकात फिजिकल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

बसस्थानकात फिजिकल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

ठळक मुद्देप्रवाशांची गर्दी : कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील बसस्थानकात सोमवारी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. प्रवाशांनी बसमध्ये चढण्यासाठी एकच गर्दी केल्याने कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. खुद्द यवतमाळ शहरातही मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे एसटी महामंडळाला केवळ ५० टक्के प्रवास वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. एसटीने प्रवास करताना अगोदर वाहकाजवळ प्रवाशांना आपली नावे नोंदवावी लागतात. त्यांना आपला पत्तासुद्धा द्यावा लागतो. नावे नोंदविण्यासाठी वाहकाजवळ सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
मंगळवारी पोळा सण असल्याने अनेक नागरिक शहरातून गावाकडे जातात. त्यामुळे सोमवारी एसटी बसस्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली होती. या परिसरात संततधार पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. चिखल तुडवित अनेक प्रवासी एसटीत चढण्यासाठी गर्दीकरीत होते. वरून सारखा पाऊस सुरू असल्याने बसमध्ये बसण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.

सर्वत्र चिखलाचे साम्राज्य
नवीन बसस्थानक परिसरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बसस्थानकात केवळ दगड-माती टाकण्यात आली. माती पावसाने वाहून गेल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांना चिखल तुडवित बसची प्रतीक्षा करावी लागते. चिखल भरलेल्या पायांनीच बसमध्ये प्रवेश करावा लागतो. यामुळे प्रवाशांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.

Web Title: Fudge of physical distance at the bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.