भाजपाच्या कळंब तालुका अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी

By Admin | Updated: December 19, 2015 02:30 IST2015-12-19T02:30:26+5:302015-12-19T02:30:26+5:30

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका चालू महिन्याच्या अखेरीस पार पडणार आहे. यात तालुकाध्यक्ष पदाचाही समावेश आहे.

Frontline for BJP president Kalamb Taluka | भाजपाच्या कळंब तालुका अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी

भाजपाच्या कळंब तालुका अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी

कळंब : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका चालू महिन्याच्या अखेरीस पार पडणार आहे. यात तालुकाध्यक्ष पदाचाही समावेश आहे. त्यामुळे कळंब तालुकाध्यक्षपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी, यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
विद्यमान तालुकाध्यक्ष शंकर मांढरे हे पुन्हा अध्यक्षपद मिळेल, अशी अपेक्षा ठेऊन आहे. या पदावर नवीन चेहरा दिला जाईल, हे निश्चित मानले जाते. त्यामुळे या पदावर आपलीच वर्णी लागावी, यासाठी अनेकांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. ऐनवेळी मतदान झाल्यास आपल्या बाजूने पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शवावी, यासाठी मनधरणी केली जात आहे.
‘आत्मा’ समितीचे अध्यक्ष असलेले कैलास बोंद्रे, माजी अध्यक्ष सुरेश महाजन, विजय नवाडे, सुरेश केवटे, विद्यमान अध्यक्ष शंकर मांढरे यांची नावे या पदासाठी चर्चीली जात आहे. पक्षश्रेष्ठीकडूनही याच नावावर विचार केला जात आहे. अध्यक्षपदासाठी सर्वांचे एकमत व्हावे, अशी जिल्हा पदाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. परंतु स्थानिक भाजपात अनेक गटतट आहे. कोणाचा पायपोस कोणाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आमदार डॉ.अशोक उईके यांच्या मध्यतीशिवाय कोण्या एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी स्थिती नाही. त्यामुळे आमदार डॉ.उईके कोणाच्या पारड्यात वजन टाकतात, हेच महत्त्वाचे ठरणार आहे.
तालुक्याचा अध्यक्ष कळंब शहराचा रहिवासी असावा, अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांची भावना आहे. यामागे बाहेरच्या उमेदवारांचा पत्ता कट करण्याचा डाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष राजू डांगे म्हणाले, संघटनात्मक निवडणुकीला सुरुवात झाली आहे. सर्व सहमतीने पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचा प्रयत्न आहे. एकमत न झाल्यास पक्षाच्या घटनेप्रमाणे निवडप्रक्रिया राबविली जाईल, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Frontline for BJP president Kalamb Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.