संपूर्ण दारूबंदीसाठी पारवा येथे मोर्चा

By Admin | Updated: April 30, 2016 02:38 IST2016-04-30T02:38:50+5:302016-04-30T02:38:50+5:30

संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करावी, या मागणीसाठी स्वामिनीच्यावतीने गुरुवारी येथे मोर्चा काढण्यात आला.

Front for the whole pistol, at Parva | संपूर्ण दारूबंदीसाठी पारवा येथे मोर्चा

संपूर्ण दारूबंदीसाठी पारवा येथे मोर्चा


पारवा : संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करावी, या मागणीसाठी स्वामिनीच्यावतीने गुरुवारी येथे मोर्चा काढण्यात आला. यामध्ये परिसराच्या विविध गावांमधील सुमारे ७०० महिला आणि नागरिक सहभागी झाल्या होत्या. नायब तहसीलदार गोलपेल्लीवार यांना निवेदन सादर करण्यात आले.
मोर्चा नायब तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर तेथे महेश पवार, देव सारडा यांनी मार्गदर्शन केले. दारूमुळे होणारे परिणाम त्यांनी सांगितले. अनेक कुटुंबातील प्रमुख व्यक्ती दारूच्या आहारी गेल्यामुळे असे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. शालेय विद्यार्थीही दारूच्या आहारी जात आहे. भर वस्तीत दारू विक्री होत असल्याने शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी व्हावी, अशी मागणी आहे. शिवाय पारवा येथे दारूबंदीची मागणीही निवेदनातून केली आहे.
या आंदोलनासाठी अजय आरेवार, दिलीप भोयर, मनोज केळकर, राजू निमसरकर, अरुण कांबळे, संदीप बर्वे, बाळू इंगोले, अशोक निमसरकर, गणेश मुद्दलवार, युसुफ खाँ पठाण, फरजाना शेख, सुनीता भालेराव, पार्वताबाई भांडारवार, विठाबाई संगनवार, नथ्थू वेट्टी, प्रज्ञा चौधरी, रिना गावंडे आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)

Web Title: Front for the whole pistol, at Parva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.