शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या घरावर पाण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:20 IST

निळोणा आटला, बेंबळाचे पाणी आणू, तोवर गोखीचे पाणी पाजू... अशा घोषणा ऐकत शांत बसलेल्या यवतमाळकरांचा आता मात्र भडका उडत आहे. डोर्लीपुऱ्यातील दहा हजार लोकांच्या पाण्याची काहीच व्यवस्था न झाल्याने रविवारी पुन्हा एकदा थेट पालकमंत्र्यांच्या घरावरच महिला धडकल्या.

ठळक मुद्देमहिलांचा रूद्रावतार : अर्धा तास ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निळोणा आटला, बेंबळाचे पाणी आणू, तोवर गोखीचे पाणी पाजू... अशा घोषणा ऐकत शांत बसलेल्या यवतमाळकरांचा आता मात्र भडका उडत आहे. डोर्लीपुऱ्यातील दहा हजार लोकांच्या पाण्याची काहीच व्यवस्था न झाल्याने रविवारी पुन्हा एकदा थेट पालकमंत्र्यांच्या घरावरच महिला धडकल्या. अर्धा तास ठिय्या देऊन बसल्यावरही पालकमंत्र्यांची भेट न झाल्याने त्या चिडल्या. शेवटी, मंत्र्यांच्या ‘पीआरओ’लाच महिलांची समजूत काढून त्यांना परत पाठवावे लागले.शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे विशेषत: महिलावर्ग वैतागलेला आहे. डोर्लीपुऱ्यातील प्रभाग क्रमांक दोन आणि आठमध्ये महिनाभरापासून पाणी मिळणे अवघड झाले आहे. या परिसरातील बोअरही आटल्या आहेत. विहिरींची पातळी खाली गेली आहे. गेल्या महिन्यापासून तर नळालाही पाणी आलेले नाही. अशा स्थितीत एका टँकरने कसाबसा पाणीपुरवठा केला जात आहे. या एकाच टँकरवर दहा हजार लोकांची तहान कशी भागणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे टँकरची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी या भागातील महिलांनी रेटून धरली आहे.या भागाकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे आता पालकमंत्र्यांनी त्यांच्या कोट्यातील टँकरद्वारे या भागात पाणी वितरित करावे, अशी मागणी घेऊन संतप्त महिलांनी रविवारी मोर्चा काढला. हा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर धडकल्यावर घोषणाबाजी झाली. या आंदोलनाचे नेतृत्व प्रमोदिनी रामटेके यांनी केले. यावेळी बेबी लांजेवार, बेबी राठोड, लक्ष्मी शेंद्रे, देवकाबाई वाघमारे, विनोद वाघदरे, सोनू नैताम, ज्ञानेश्वर नाकतोडे, गंगाधर खडसे, विद्या वाघदरे, देवका मराठे, शोभा ठाकरे, मंदा चिकाने, शोभा ठाकरे, गीता चौधरी यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.पीआरओंनी काढली मोर्चेकºयांची समजूतधुणीभांडी, कॅटरर्स आणि रोजमजुरी करणारा वर्ग या परिसरात राहतो. त्यांनी काम करायचे की पाणी भरायचे, असा प्रश्न उपस्थित केला. परंतु, त्यांची व्यथा ऐकून घेण्यासाठी पालकमंत्रीच यावेळी उपस्थित नव्हते. त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यालाच या मोर्चेकरी महिलांची समजूत काढावी लागली. दोन दिवसात पाणी मिळेल, असे सांगितल्याने अर्धातास ठिय्या देऊन या महिला निघून गेल्या. आता त्यांना आपल्या भागात पाणी येण्याची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई