वडार समाजाचा उमरखेडमध्ये मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:18 IST2018-01-17T23:17:39+5:302018-01-17T23:18:00+5:30
लातूर जिल्ह्यातील टेंभूर्णी येथे अत्याचार करून वडार समाजातील तरुणीचा खून करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी वडार समाज संघटनेच्यावतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला.

वडार समाजाचा उमरखेडमध्ये मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : लातूर जिल्ह्यातील टेंभूर्णी येथे अत्याचार करून वडार समाजातील तरुणीचा खून करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी वडार समाज संघटनेच्यावतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेकºयांना रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी मार्गदर्शन केले.
टेंभूर्णी येथील महाविद्यालयीन तरूणी कोमल पवार हिचे २८ डिसेंबर रोजी अपहरण करून तिच्यावर अमानुष अत्याचार करून हत्या करण्यात आली. याघटनेला १७ दिवस लोटले तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे वडार समाजात तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. आरोपीला तात्काळ अटक करावी यामागणीसाठी येथील वडार चौकातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. मोर्चा एसडीओ कार्यालयावर पोहल्यानंतर तेथे प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कोमल पवार खून्याना सरकार पकडत नाही. मुख्य आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन नेटाने सुरू ठेवावे. त्यासाठी आपण पूर्णशक्तीनिशी वडार समाजाच्या पाठीेशी उभे राहणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार विजय खडसे, शिवाजी माने, डॉ. श्रावण रपणवाड, कैलास पवार, चंदू साकळकर, तातेराव हनवते, गणेश मेंढे, उत्तम जाधव, अमोल बाभुळकर, एमआयएमचे सैयद इरफान, ओंकार चव्हाण, रेखा गवळे, साहेबराव बेळे, भगवान बाभुळकर, शंकर पवार, विजय मेंढे, सुभाष बाभुळकर आदीसह शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते.