पुसद-उमरखेड येथे मराठा आरक्षणासाठी मोर्चा

By Admin | Updated: November 27, 2014 23:42 IST2014-11-27T23:42:40+5:302014-11-27T23:42:40+5:30

मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करीत पुसद आणि उमरखेड येथे मराठा सेवा संघ व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात समाज

Front for the Maratha Reservation at Pusad-Umarkhed | पुसद-उमरखेड येथे मराठा आरक्षणासाठी मोर्चा

पुसद-उमरखेड येथे मराठा आरक्षणासाठी मोर्चा

पुसद/उमरखेड : मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करीत पुसद आणि उमरखेड येथे मराठा सेवा संघ व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
पुसद येथे छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ झाला. विविध घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयासमोरील जयस्तंभ चौकात पोहोचला. त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी चंद्रकांंत जाजू यांना आरक्षणाच्या मागणीचे निवेदन दिले. तत्पूर्वी झालेल्या सभेत महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष देशमुख यांनी आरक्षणाची कायदेशीर बाजू विशद केली. पंचायत समितीचे उपसभापती अवधूत मस्के, डॉ. समीर कदम यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. मोर्चात माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, अनिरुद्ध पाटील, अशोक बाबर, नगरसेवक डॉ. भारत जाधव, डॉ. भानुप्रकाश कदम, दिगंबर जगताप, प्रा.डॉ.संजय खुपासे, प्रा.विजय कदम, आशा कदम, शुभांगी पानपट्टे, प्रा. रजनी भोयर, हेमलता काकडे, मंजुषा काकडे, सुधीर देशमुख, साहेबराव ठेंगे, अण्णासाहेब ठेंगे, राजभाऊ देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पानपट्टे, नितीन पवार, गणेश पावडे, शेख नादरे, गणेश चौधरी, पिंटू पाटील यांनी परिश्रम घेतले. उमरखेड व महागाव तालुक्यातील हजारोच्या संख्येने जमलेल्या मराठा समाज बांधवांनी उमरखेडच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेला. मोर्चाला प्रारंभ उमरखेडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती समोरुन करण्यात आला. विविध घोषणा देत नागरिक सहभागी झाले होते. मोर्चात माजी आमदार अ‍ॅड. अनंतराव देवसरकर, प्रकाश पाटील देवसरकर, राम देवसरकर, अ‍ॅड. अनिल माने, दत्तदिगंबर वानखडे, सुरेश कदम, विलास चव्हाण, चितांगराव कदम, शिवाजी माने, तातू देशमुख, साहेबराव कदम, सीताराम ठाकरे, अनिल नरवाडे, संदीप ठाकरे, शैलेश कोपरकर, वसंत देशमुख, कपिल चव्हाण, डॉ. कल्याण राणे, दिलीप सुरोशे, अ‍ॅड. माधव माने, अ‍ॅड. बळीराम मुटकुळे, अ‍ॅड. संजय जाधव, अ‍ॅड. निर्गुन कल्याणकर यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. (वार्ताहर)

Web Title: Front for the Maratha Reservation at Pusad-Umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.