चोरट्यांच्या टोळीची पोलिसांशी फ्रिस्टाईल

By Admin | Updated: June 19, 2014 00:19 IST2014-06-19T00:19:25+5:302014-06-19T00:19:25+5:30

मुसळधार पाऊस आणि त्यातच खंडीत झालेल्या विजपुरवठ्याने अंधाराचा फायदा घेत सहा चोरट्यांची टोळी चोरीच्या प्रयत्नात होती. दरम्यान मागावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.

Fristyle with the gang of thieves | चोरट्यांच्या टोळीची पोलिसांशी फ्रिस्टाईल

चोरट्यांच्या टोळीची पोलिसांशी फ्रिस्टाईल

यवतमाळ : मुसळधार पाऊस आणि त्यातच खंडीत झालेल्या विजपुरवठ्याने अंधाराचा फायदा घेत सहा चोरट्यांची टोळी चोरीच्या प्रयत्नात होती. दरम्यान मागावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरट्यांनी त्यांना मारहाण करून पसार होण्याची तयारी चालविली. तब्बल अर्धातास फ्रिस्टाईल झाल्यानंतर दोन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. ही घटना येथील पिंपळगावातील विशाल नगरात मंगळवारी रात्री घडली.
विशाल शंकर चव्हाण (१९) आणि सुनील उर्फ भुऱ्या वामन जनबंधू (२५) दोघेही रा. सुराणा ले-आउट अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहे. तर सुरेश गढीवाल, अक्षय सहारे, ऋषी आणि मोबीन सर्व रा. तलावफैल अशी त्यांच्या पसार साथिदारांची नावे आहे. एक सहा सदस्यीय चोरट्यांची टोळी विशाल नगरातील किराणा दुकानांमध्ये चोरी करण्याच्या बेतात असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकातील शिपायी आशिष गुल्हाने याला मिळाली. तत्काळ घटनास्थळ गाठून त्याने चोरट्यांवर पाळत ठेवली. दरम्यान चोरटे विशाल नगरातील सुभाष भूत यांच्या दुकानात शिरले. तेव्हा शिपायी आशिषने घटनेची माहिती शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील जमादार प्रकाश साटम, विनोद राठोड यांना देवून मदतीसाठी बोलाविले. तिघांनी मिळून संबंधीत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा चोरट्यांनी त्यांना मारहाण करून पसार होण्याची तयारी चालविली. त्यांच्यात तब्बल अर्धातास फ्रिस्टाईल झाल्यानंतर दोन चोरटे पोलिसांच्या हाती लागले. त्यांचे चार साथिदार मात्र पसार होण्यात यशस्वी झाले. चोरट्यांकडून दाराची कडीत तोडण्यासाठी वापरण्यात येणारी एक सब्बल आणि अन्य साहित्य जप्त केले. तसेच त्यांच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून अटक केली. या चोरट्यांकडून जबरी चोरी आणि घरफोडीचे अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.
(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Fristyle with the gang of thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.