केवळ चार हजारांसाठी मित्रांनीच केला मित्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST2019-11-04T06:00:00+5:302019-11-04T06:00:04+5:30

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच मित्र राजेश रामकृष्ण भोंगळे (३०) याने योगेशला चार हजार रूपये उसने दिले होते. हेच पैसे परत मागण्यावरून या दोघात वणीकडे जात असताना शुक्रवारी दुपारी १ वाजता गौराळा खाणीजवळ वाद झाला. यावेळी खुनातील दुसरा आरोपी सुशांत बाळनाथ पुनवटकर (३१) हा घटनास्थळी हजर होता. या दोघांनी खाणीत नेऊन योगेशला मारहाण केली व दुपट्ट्याने गळा आवळून त्याचा खून केला.

Friends murdered a friend only for four thousand | केवळ चार हजारांसाठी मित्रांनीच केला मित्राचा खून

केवळ चार हजारांसाठी मित्रांनीच केला मित्राचा खून

ठळक मुद्देमारेगावातील घटना : चार तासातच पोलिसांनी केला उलगडा

लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : उसने घेतलेल्या चार हजार रूपयावरून वाद होऊन मित्रानेच मित्राचा खून केल्याचा प्रकार मारेगाव येथे घडला. योगेश रामभाऊ गहूकर (२७) असे मृताचे नाव आहे. तर राजेश रामकृष्ण भोंगळे व सुशांत बाळनाथ बुनवटकर अशी आरोपींची नावे आहे.
येथील योगेश गहुकर या अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या युवकाचा वणीतील रेल्वे क्रॉसिंगजवळ शनिवारी मृतदेह आढळला होता. वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या चार तासात खुनातील आरोपींना ताब्यात घेतले व खुनाचे रहस्य उलगडले. मारेगाव येथील योगेश गहुकर हा शासकीय आयटीआयमध्ये कंत्राटी निदेशक म्हणून वर्षभरापासून कार्यरत होता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच मित्र राजेश रामकृष्ण भोंगळे (३०) याने योगेशला चार हजार रूपये उसने दिले होते. हेच पैसे परत मागण्यावरून या दोघात वणीकडे जात असताना शुक्रवारी दुपारी १ वाजता गौराळा खाणीजवळ वाद झाला. यावेळी खुनातील दुसरा आरोपी सुशांत बाळनाथ पुनवटकर (३१) हा घटनास्थळी हजर होता. या दोघांनी खाणीत नेऊन योगेशला मारहाण केली व दुपट्ट्याने गळा आवळून त्याचा खून केला. योगेश मृत पावल्याचे कळताच त्याला कचऱ्यात लपवून ठेवले व योेगेशची दुचाकी घेऊन आरोपी वणीकडे निघाले. त्याची दुचाकी वणीत बेवारस सोडून ते गावाकडे परत गेले. याच रात्री आरोपी राजेश हा मित्राकडे पार्टीला हजर होता. पोलिसांनी योगेशच्या कॉल डिटेल्सवरून अनेकांचे बयाण नोंदविले. राजेशने खून केल्याचे कबुल केले. आरोपीविरूद्ध भादंवि ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.

दोन्ही मित्र करीत होते स्पर्धा परीक्षेची तयारी
मृतक योगेश गहूकर व मारेकरी राजेश भोंगळे हे दोघेही बीईचे शिक्षण घेत असतानापासून मित्र होते. गेल्या दोन वर्षांपासून ते मारेगावच्या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारीही करीत होते. दरम्यान राजेशने खुनानंतर योगेशचे प्रेत गौराळा गिट्टी खाण परिसरात झुडूपात लपविले आणि अभ्यासिकेच्या मुलांनी आयोजित केलेल्या पार्टीत पोहोचला. त्यानंतर पहाटे खुनातील सहकारी सुशांतच्या मदतीने योगेशचा मृतदेह दुचाकीने वणी येथे नेऊन टाकला. मृतदेह घासत गेल्याने त्याच्या दोन्ही पायाची बोटे घासलेल्या अवस्थेत आढळली.

Web Title: Friends murdered a friend only for four thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून