स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कार

By Admin | Updated: August 10, 2015 02:12 IST2015-08-10T02:12:55+5:302015-08-10T02:12:55+5:30

तालुक्यातील उमरी स्मारक येथे रविवारी क्रांतिदिनानिमित्त स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

Freedom fighter soldiers felicitate | स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कार

स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कार

उमरी स्मारक : क्रांतिदिनाच्या कार्यक्रमात मान्यवरांनी केले वृक्षारोपण
बाभूळगाव : तालुक्यातील उमरी स्मारक येथे रविवारी क्रांतिदिनानिमित्त स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे शहीद यशवंत लुडबाजी पाळेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या कार्यक्रमात शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांना सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे होत्या. प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी बाबाराव राऊत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, महिला व बालकल्याण सभापती विमल चव्हाण, समाजकल्याण सभापती लता खांदवे, जिल्हा परिषद सदस्य अर्चना कोडापे, योगीता कोडापे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण, माजी शिक्षण सभापती भीमसिंग सोळंकी, पंचायत समिती सभापती शशिकला दिघाडे, अतिरिक्त सीईओ शरद कुळकर्णी, उमरीच्या सरपंच उमा मडावी आदी उपस्थित होते.
यशवंत लुडबाजी पाळेकर यांच्या स्मरणार्थ उमरी येथे स्मारक उभारण्यात आले. या स्मारकाची देखभाल व देखरेखीचे काम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र.१ कडे देण्यात आले. तेव्हापासून या ठिकाणी दरवर्षी क्रांतिदिनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो कुटुंबांनी प्राणाची आहुती दिली. त्यामुळेच आपण आज स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. आपण आयएएस अधिकारी होण्यामागे स्वातंत्र्य संग्राम सेनानींचे मोठे योगदान आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधूनही अनेकजण एमपीएससी, यूपीएससीची परीक्षा देऊन अधिकारी होऊ शकतात, असे मत जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्त केले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा सभागृहात न घेता उमरी स्मारक येथे घ्यावी. उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी प्रास्ताविक केले. स्मारकासाठी जागा दिल्याबद्दल त्यांनी रामचंद्र गांगेकर यांचे आभार मानले. अध्यक्षीय भाषणात डॉ.आरती फुपाटे यांनी स्वातंत्र्य संग्राम काळातील आठवणी विशद केल्या.
संचालन प्रा.शंकर सांगळे यांनी केले तर आभार कार्यकारी अभियंता मनोहर शहारे यांनी मानले. तहसीलदार किरण सावंत पाटील, गटविकास अधिकारी राजीव फडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घोरसडे, सहाय्यक गटविकास अधिकारी रमेश दोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक हुलगे, संजय पिसाळकर, एम.एम. जाधव, राघमवार, कारिया, मानकर, पी.एन. मस्के, पी.एस. काळबांधे, आशिष गावंडे, सचिन महल्ले, डॉ.बबन बोंबले यांच्यासह पंचायत समितीच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते उमरी येथील स्मारक परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. (प्रतिनिधी)
ज्येष्ठांच्या सन्मानाने भारावून गेले वातावरण
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक बाबारावजी राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. झेंडागीत गायन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वातंत्र्य सेनानी बाबारावजी राऊत, शेख हसन शेख चाँदभाई, शहीद पत्नी सीताबाई तेलंग, नंदकुमार गांगेकर, धनराज छल्लाणी, रमेश चव्हाण, माजी सैनिक गोपाल धलवार, कौसल्या पिसाळकर, कौसल्या चव्हाण, रुख्मा कपाट, जनाबाई वरवाडे, गिरमेताई यांच्यासह रासेयोचे जिल्हा समन्वयक प्रा.कमल राठोड, प्रा.शंकर सांगळे आदींचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य सेनानी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी वातावरण भावूक झाले होते.

Web Title: Freedom fighter soldiers felicitate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.