शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी मोफत प्रवास सुविधा

By admin | Updated: November 9, 2016 00:24 IST

शेतमाल विकून घरी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या खिशावर चोरट्यांच्या हमखास नजरा असतात.

बाजार समिती ते बसस्थानक : यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम यवतमाळ : शेतमाल विकून घरी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या खिशावर चोरट्यांच्या हमखास नजरा असतात. यातून लुटमारीचे प्रकार घडतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी यवतमाळ बाजार समितीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. बाजार समिती ते बसस्थानक अशी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नवनियुक्त संचालक मंडळाने या संदर्भातील प्रस्ताव पणन महासंघाकडे पाठविला आहे. यवतमाळ बाजार समितीमध्ये नवनियुक्त संचालकांनी विविध उपाय योजनाची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलले आहे. याठिकाणी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना गावी जाताना सुरक्षा मिळावी म्हणून वाहनाची मोफत व्यवस्था केली जाणार आहे. याकरीता बाजार समिती दोन वाहनाची खरेदी करणार आहे. यासंदर्भात पणन महासंघाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच मोफत वाहन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे.शेतमाल विक्रीसाठी आणतांना अनेक वेळा उशीर झाल्याने शेतकऱ्यांना उपाशी झोपावे लागते. माफक दरात शेतकऱ्यांना भोजन मिळावे म्हणून बचत गटाच्या माध्यमातून झुनका भाकर केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पणन महासंघाकडे पाठविला आहे. पिण्याचे शुध्द पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे म्हणून फिल्टर प्लान्ट या ठिकाणी बसविला जाणार आहे. प्रसाधनगृह उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. कामाला गती मिळावी आणि शेतमालास अधिक दर मिळावा म्हणून नवीन व्यापाऱ्यांना आमंत्रण दिले जाणार आहे. बैलबाजार आणि भाजी मंडीसाठी विशेष नियोजन केले जात आहे. भाजी मंडीतील दुकानासाठी आकारलेले दर कमी करण्यात येणार आहेत. अनामत रक्कमही कमी करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. ही अनामत रक्कम एक लाख रूपयावरून ७५ हजार रूपये करण्यात आली आहे. बाजार समितीत विविध सुविधा उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)अकोलाबाजार येथे दोन आठवड्यात खरेदीयवतमाळ बाजार समितीची उपबाजार समिती असलेल्या अकोलाबाजार केंद्र तीन वर्षांपासून बंद आहे. हे केंद्र सुरू करण्यासाठी मंगळवारी बैठक झाली. बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक यांच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी अडचणी मांडल्या. पिण्याचे पाणी, काटा आणि अस्वच्छता हे प्रमुख प्रश्न या ठिकाणी आहेत. १० ते १५ दिवसात हे प्रश्न सुटतील खरेदी नव्याने सुरू होईल. अशी माहिती ढोक यांनी ‘लोकमत’ला दिली.