ग्रामसेवकांच्या थकबाकीचा मार्ग मोकळा

By Admin | Updated: December 17, 2015 02:38 IST2015-12-17T02:38:05+5:302015-12-17T02:38:05+5:30

मंजूर झालेला ग्रेड पे केवळ निधी नसल्याने अडला होता. मात्र आता ग्राम विकास विभागाने पुरवणी मागणीत यासाठीचा निधी मंजूर केला आहे.

Free the Gramsevak's dues | ग्रामसेवकांच्या थकबाकीचा मार्ग मोकळा

ग्रामसेवकांच्या थकबाकीचा मार्ग मोकळा

निधी मंजूर : राज्य ग्रामसेवक संघाच्या प्रयत्नांना यशाचा दावा
यवतमाळ : मंजूर झालेला ग्रेड पे केवळ निधी नसल्याने अडला होता. मात्र आता ग्राम विकास विभागाने पुरवणी मागणीत यासाठीचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यभरातील ग्रामसेवकांच्या थकबाकीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाने केलेल्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचा दावा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून करण्यात आला आहे.
ग्रामविकास अधिकारी हे ग्रामसेवकाचे वरिष्ठ वेतनश्रेणीतील आणि पदोन्नतीचे पद असल्याने वरिष्ठ पदाचा चार हजार २०० रुपये ग्रेड पे देण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, ९ सप्टेंबर २०१४ च्या शासन निर्णयाने ग्रामविकास अधिकारी पदास तीन हजार ५०० ग्रेड पे १ आॅक्टोबर २०१४ पासून मंजूरी दिली. विधिमंडळाच्या मान्यतेनंतर निधी वितरणाचे आदेश देण्यात आले होते. मात्र यासाठी विलंब झाला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक मंडळाच्या शिष्टमंडळाने पाठपुरावा केला. दरम्यान ग्रामविकास विभागाने पुरवणी मागणीस मंजूरी दिली आहे. यातून ग्रामसेवकांना वाढीव ग्रेड पेपोटीची थकबाकी मिळणार आहे.
वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य ग्रामसेवक संघाला हे यश आल्याचे राज्याध्यक्ष विजय मसकर, सरचिटणीस के.आर. विरूळकर यांनी म्हटले आहे. या संदर्भातील माहिती अमरावती विभाग अध्यक्ष श्यामसुंदर हजारे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुभाष भोयर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद मोरे यांनी कळविली आहे. (वार्ताहर)

Web Title: Free the Gramsevak's dues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.