वाघांसह वन्यजीवांचा मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:00 AM2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:00:13+5:30

वाघ, वाघाचे बछडे यासह इतर वन्यजीव अभयारण्यातील रस्त्यावर अगदी सहज फिरत आहेत. वन्यजीवांची कोरोनाच्या अनुषंगाने काळजी म्हणून अभयारण्यात वनाधिकाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली आहे. या गस्तीदरम्यान एका वनाधिकाऱ्याला या प्राण्यांचा मुक्तसंचार आढळून आला. सर्वत्र लॉकडाऊन असले तरी निसर्ग मात्र खुलून गेला आहे.

Free communication of wildlife with tigers | वाघांसह वन्यजीवांचा मुक्तसंचार

वाघांसह वन्यजीवांचा मुक्तसंचार

Next
ठळक मुद्देटिपेश्वर अभयारण्य : गस्तीदरम्यान निसर्गाची विविध रूपे आली पुढे

प्रवीण पिन्नमवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : कोरोनाला हरविण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून आता उत्तोरोत्तर काही चांगल्याही गोष्टी पुढे येत आहेत. विशेषत: निसर्गाची विविध रूपे यानिमित्याने पहायला मिळत आहेत. टिपेश्वर अभयारण्यातील वाघासह इतर वन्यजीव मुक्तसंचार करताना आढळून येत आहेत. अभयारण्यात गस्त करणाऱ्या वन अधिकारी, कर्मचाऱ्यांना हा अनुभव येत आहे.
वाघ, वाघाचे बछडे यासह इतर वन्यजीव अभयारण्यातील रस्त्यावर अगदी सहज फिरत आहेत. वन्यजीवांची कोरोनाच्या अनुषंगाने काळजी म्हणून अभयारण्यात वनाधिकाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली आहे. या गस्तीदरम्यान एका वनाधिकाऱ्याला या प्राण्यांचा मुक्तसंचार आढळून आला. सर्वत्र लॉकडाऊन असले तरी निसर्ग मात्र खुलून गेला आहे.
राज्यात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून वन पर्यटन पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले.त्यात टिपेश्वर अभरण्याचाही समावेश आहे. टिपेश्वर हे देशातील वाघासाठीचे व इतर प्राण्यांचे एक नावाजलेले अभयारण्य आहे. अभरण्यात देशी, विदेशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते.
या पर्यटकांच्या संपर्कात येणाºया वनाधिकारी, कर्मचाºयांना विषाणूची बाधा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे अभयारण्य बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जंगलक्षेत्र मानव विरहित करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे वातावरणात झालेल्या बदलाने तसेच मानवाचा हस्तक्षेप कमी झाल्याने अभरण्यात वाघसह इतर प्राणी मुक्तसंचार करत आहेत. तसेच पक्षी, प्राणी, वनस्पती, झाडे यांच्या बाबतीत अनेक चांगले परिणाम दिसून येत असल्याचेही वनप्रशासनाकडून सांगितले जात आहे.
टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याचे नियोजन वन प्रशासनाकडून केले जात आहे. अभरण्यात वाढलेली वाघांची संख्या प्रजनानासाठी तेथील पोषक वातावरण तसेच जिल्ह्याला पर्यटनासाठी चालना देणे हा हेतू समोर ठेवून वनप्रशासन काम करीत असल्याचे सांगितले जात आहे. वन्यप्रेमीचाही या निर्णयाकडेकडे नजरा लागल्या आहेत.

Web Title: Free communication of wildlife with tigers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल