गर्दीच्या ठिकाणी मोफत रक्तदाब तपासणी

By Admin | Updated: May 17, 2017 00:54 IST2017-05-17T00:54:22+5:302017-05-17T00:54:22+5:30

दैनंदिन धावपळीत स्वत:च्या रक्तदाबाकडे कुणीही फारसे लक्ष देत नाही. खास दवाखान्यात जाऊन रक्तदाब तपासणी तर क्वचितच केली जाते.

Free blood pressure check in crowded places | गर्दीच्या ठिकाणी मोफत रक्तदाब तपासणी

गर्दीच्या ठिकाणी मोफत रक्तदाब तपासणी

आयएमएचे आयोजन : जागतिक रक्तदाब दिनानिमित्त आज राबविणार उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दैनंदिन धावपळीत स्वत:च्या रक्तदाबाकडे कुणीही फारसे लक्ष देत नाही. खास दवाखान्यात जाऊन रक्तदाब तपासणी तर क्वचितच केली जाते. परंतु, त्यातूनच गंभीर आजार निर्माण होतात. ही मानसिकता ओळखून बुधवार, १७ मे रोजी यवतमाळातील तज्ज्ञ डॉक्टर थेट गर्दीच्या ठिकाणीच नागरिकांना गाठून त्यांची मोफत रक्तदाब तपासणी करून देणार आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशनने जागतिक उच्च रक्तदाब दिनाच्या निमित्ताने हा आगळा उपक्रम आयोजित केला आहे. उच्च रक्तदाबाकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यातून हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायू किंवा किडनी खराब होणे हे धोके संभवतात. त्यामुळे रक्तदाबाची नियमित तपासणी आवश्यक आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक रक्तदाब दिनी आयएमएने पुढाकार घेतला आहे. यवतमाळ शहरातील गर्दीची ठिकाणे गाठून तेथेच बुथ लावून लोकांचा रक्तदाब (बीपी) मोफत तपासून देणार आहेत. ज्यांचा रक्तदाब प्रमाणापेक्षा अधिक आढळेल, अशांना मोफत मार्गदर्शनही केले जाणार आहे. बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय अशा गर्दीच्या ठिकाणांवर तपासणी बुथ सकाळी ९ वाजतापासून सुरू राहणार आहेत. सकाळी ८ वाजता जनजागृती रॅलीही काढली जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धोटे आणि डॉ. येलके रॅलीला हिरवी झेंडी दाखवतील. जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपरिषद, नेताजी चौक, दत्त चौक अशा मार्गाने बसस्थानक चौकात रॅलीचा समारोप होईल. या उपक्रमात आयएमए महिला शाखा, बालरोग तज्ज्ञ संघटना, स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना, वैद्यकीय प्रतिनिधींची एमएसएमआरए, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मार्ड आदी विविध संघटना सहभागी होणार आहेत. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन आयएमएचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन बोरा आणि सचिव डॉ. स्वप्नील मानकर यांनी केले आहे.

Web Title: Free blood pressure check in crowded places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.