जनधन योजनेच्या खातेदारांची फसवणूक

By Admin | Updated: November 26, 2014 23:15 IST2014-11-26T23:15:13+5:302014-11-26T23:15:13+5:30

पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून राबविल्या जात असलेल्या जनधन योजने अंतर्गत पुसद येथे बँकेच्या खातेदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

The fraud of the account holders of the Janshan Yojana | जनधन योजनेच्या खातेदारांची फसवणूक

जनधन योजनेच्या खातेदारांची फसवणूक

संगणक केंद्रचालकांचा प्रताप : नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन
पुसद : पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून राबविल्या जात असलेल्या जनधन योजने अंतर्गत पुसद येथे बँकेच्या खातेदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
येथील संगणक केंद्र संचालक हे खातेदारांकडून जनधन योजने अंतर्गत खाते उघडण्यासाठी प्रत्येकी १०० रुपये घेत आहेत. त्यामुळे या योजनेत प्रचंड गैरव्यवहार होत असल्याचा आरोप पुसद भाजपाच्यावतीने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पुसद शाखा व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच या योजनांतर्गत खाते उघडणाऱ्या नागरिकांनी कुठेही पैसे देऊ नये असे आवाहनसुद्धा करण्यात आले आहे. पुसद तालुक्यात स्टेट बँकेच्या माध्यमातून प्रधानमंत्री जनधन योजनेचे खाते उघडणे सुरू आहे. या योजनेंतर्गत झिरो बॅलन्सवर नागरिकांना खाते उघडता येते. असे असताना येथील सुभाष टॉकीज समोरिल विद्यानंद झेरॉक्स या दुकानातून खाते उघडताना १०० रुपयांची मागणी केली जात आहे.
शहरातील कार्ला रोडवरील एका शाखेने प्रत्येक खातेदारांकडून २० रुपये वसुल केले आहे. तसेच शहरालगतच्या श्रीरामपूर येथील मिलिंद काकड नामक व्यक्ती हे खाते उघडण्यासाठी नागरिकांकडून प्रत्येकी १०० रुपये घेत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. नागरिकांकडून या योजनेसाठी पैसे उकळणाऱ्या अशा परवाना धारकांचे परवाने तत्काळ रद्द करण्यात यावे व ग्राहकांचे पैसे त्यांना परत देण्यात यावे तसेच नागरिकांची लूट थांबवावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्यावतीने बँक व्यवास्थपकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष भारत पाटील, सरचिटणीस संतोष मुके, उपाध्यक्ष बाळासाहेब उखळकर, विश्वजीत सरनाईक, संतोष आर्य आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: The fraud of the account holders of the Janshan Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.