विजेचा शॉक लागून आईच्या मृत्यू, चार वर्षीय सान्वी पोरकी झाल्याने हळहळ
By विलास गावंडे | Updated: September 11, 2023 19:12 IST2023-09-11T19:11:48+5:302023-09-11T19:12:34+5:30
कपडे वाळवण्यासाठी बांधण्यात आलेल्या तारात वीज प्रवाह संचारला होता

विजेचा शॉक लागून आईच्या मृत्यू, चार वर्षीय सान्वी पोरकी झाल्याने हळहळ
नेर (यवतमाळ) : कपडे वाळवताना विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वटफळा येथे सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. काजल प्रवीन राऊत (२८), असे या महिलेचे नाव आहे. काजलच्या मृत्यूने चार वर्षीय चिमुकली सान्वी पोरकी झाली.
कपडे वाळवण्यासाठी बांधण्यात आलेल्या तारात वीज प्रवाह संचारला होता. त्यावर कपडे टाकत असताना काजल यांना शॉक लागला. हा प्रकार लक्षात येताच तिला शेजारी राहात असलेल्या गोपाल राऊत यांनी मोटरसायकलने तात्काळ नेर येथील शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. तिच्या चेहऱ्यावर आणि उजव्या हाताच्या बोटावर जळाल्याच्या खुणा आहे. काजलच्या मागे आई, वडील, पती, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.