जिल्ह्यात चार अपघातात चौघे ठार
By Admin | Updated: January 25, 2015 23:22 IST2015-01-25T23:22:55+5:302015-01-25T23:22:55+5:30
जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाले. नेर तालुक्यातील मुखत्यारपूरजवळ सहा वर्षीय बालक, लासीनाजवळ तरुण, चिल्ली येथे इसम तर दारव्हा तालुक्यातील कामठवाडाजवळ वृद्ध ठार झाला.

जिल्ह्यात चार अपघातात चौघे ठार
यवतमाळ : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाले. नेर तालुक्यातील मुखत्यारपूरजवळ सहा वर्षीय बालक, लासीनाजवळ तरुण, चिल्ली येथे इसम तर दारव्हा तालुक्यातील कामठवाडाजवळ वृद्ध ठार झाला.
ब्राह्मणवाडा येथील काही जण भिलटेक यात्रेसाठी आॅटोरिक्षाने (एम.एच. २९/व्ही-८२०८) जात होते. मुखत्यारपूर-धनज वळणावर रविवारी सकाळी १०.३० वाजता आॅटोरिक्षा उलटून सुजल घनश्याम राठी (६ वर्षे) रा. ब्राह्मणवाडा (पूर्व) हा ठार झाला. तर धुर्पता भगवान राठोड (६०), सचिन हरिहर चरडे (१८), विठ्ठल कोल्हे (४४) हे गंभीर जखमी आहेत. त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले. आॅटोरिक्षा चालक घनश्याम राठोड, पार्वतीबाई राठोड, प्रज्ज्वल मडावी, सायली राठोड या जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
यवतमाळकडून नेरकडे भरधाव वेगाने जाणारी दुचाकी लासीना येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या ड्रमवर जाऊन आदळली. त्यात अमोल रंगारी (२६) रा. टाकळी सलामी ता. नेर हा ठार झाला. तर त्याचा मित्र गणेश कोसाटी (२८) हा गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
तिसरी घटना उमरखेड तालुक्यातील चिल्ली येथे घडली. गावातीलच किसन रामसिंग पवार (५८) हे किराणा आणण्यासाठी जात असताना भरधाव ट्रकने (एम.एच.३१-सी.क्यू-२४२१) रविवारी सकाळी १० धडक दिली. त्यात किसन पवार जागीच ठार झाले. या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दारव्हा तालुक्यातील कामठवाडाजवळील गोखी मारुती मंदिराजवळ क्रुझने दिलेल्या धडकेत किसन गणपत पवार (६०) रा. कामीनदेव हा जागीच ठार झाला. तो पायदळ जात असताना एका प्रवासी क्रुझरने त्याला धडक दिली. (लोकमत चमू)