कोदोरी येथील चार घरे आगीत भस्मसात
By Admin | Updated: March 5, 2017 01:09 IST2017-03-05T01:09:00+5:302017-03-05T01:09:00+5:30
येथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोदोरी येथील चार घरांना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास

कोदोरी येथील चार घरे आगीत भस्मसात
पाटणबोरी : येथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोदोरी येथील चार घरांना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
कोदोरी येथील व्यंकटराव अल्लुरवार यांचे पैैनगंगा नदीच्या काठावर शेत आहे. या शेतीच्या कुंपणावरून जाणाऱ्या इलेक्ट्रीक तारांमध्ये घर्षण होऊन ठिणगी पडली. या ठिणगीमुळे पोचीराम कापडे यांच्या घराजवळ असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली. त्यानंतर कापडे यांच्या गोठ्याला सर्वप्रथम आग लागली. ही आग किसन करतू कापडे यांच्याही गोठ्याला लागली. पोचीराम कापडे यांचे या आगीत घर व गोठा जळून खाक झाला. त्यात टी.व्ही., फोन, धान्य, कापड व इतर साहित्य जळून खाक झाले. यामध्ये त्यांचे दीड लाखांचे नुकसान झाले. किसन कापडे यांच्या घर व गोठ्याला लागलेल्या आगीत ५० हजारांचे नुकसान झाले. विठ्ठल इस्तारी मत्ते यांच्या घराला मागून आग लागल्याने त्यांचे घरही अर्धे जळाले. यात ५० हजारांचे नुकसान झाले. पोचूबाई कापडे यांच्याही घराला आग लागून जवळपास ५० हजारांचे नुकसान झाले आहे.
या आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन घरांवर पाणी मारले. त्यामुळे अर्धी आग आटोक्यात आली होती. त्यानंतर आदिलाबाद व पांढरकवडा येथील अग्नीशमन दलही घटनास्थळी पोहोचले. या दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थळाला तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंकीवार यांनी भेट दिली. (वार्ताहर)