अतिक्रमणप्रकरणी चार ग्रामसेवकांना ‘शो कॉज’
By Admin | Updated: June 22, 2016 02:27 IST2016-06-22T02:27:59+5:302016-06-22T02:27:59+5:30
तालुक्यातील वाई (रूई) येथे एका संस्थेने ग्रामपंचायत कार्यालयाच्या जागेत अतिक्रमण करून व्यायामशाळा थाटली.

अतिक्रमणप्रकरणी चार ग्रामसेवकांना ‘शो कॉज’
संस्थेवर गुन्हा : वाई येथे थाटली व्यायामशाळा
यवतमाळ : तालुक्यातील वाई (रूई) येथे एका संस्थेने ग्रामपंचायत कार्यालयाच्या जागेत अतिक्रमण करून व्यायामशाळा थाटली. या प्रकरणात तत्कालीन चार ग्रामसेवकांना दोष धरून निलंबनाची कारवाई का करण्यात येऊन नये अशी नोटीस बजावली आहे. तर अतिक्रमण करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
वाई येथील तत्कालीन ग्रामसेवक सविता बोरखडे, एस.व्ही. भोयर, एन.डी. देवळे, प्रवीण कावलकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. ग्रामपंचायतच्या जागेत खोटा ठराव आणि नमुना-८ देऊन अतिक्रमण करण्यास मदत केल्याचा आरोप आहे.
त्यामुळे निलंबनाची कारवाई का करण्यात येऊन नये, याचा खुलासा तीन दिवसाच्या आत करावा, असे निर्देश या ग्रामसेवकांना देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत इमारतीमध्ये कान्हा ग्रामीण विकास बहुद्देशिय सामाजिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चंपत आरेकर यांनी दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यांच्य विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी दिपक सिंगला यांनी दिले आहेत. वाई येथील ग्रामस्थ प्रशांत देवतके यांच्या तक्रारीवरून हा भुखंड घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्यात लिप्त ग्रामसेवकांवरही कारवाई कोणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)