एकाच दिवशी चार शेतकरी आत्महत्या
By Admin | Updated: January 31, 2015 00:20 IST2015-01-31T00:20:08+5:302015-01-31T00:20:08+5:30
एकट्या यवतमाळ जिल्यात आज चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत, येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात कळंब तालुक्यातील ...

एकाच दिवशी चार शेतकरी आत्महत्या
यवतमाळ : एकट्या यवतमाळ जिल्यात आज चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत, येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात कळंब तालुक्यातील देवनाला येथील तुलसीराम राठोड व सोनेगाव येथील देवराव भागवत तर घाटंजी तालुक्यातील बोदडीचे बन्सी राठोड तर केळापूर तालुक्यातील मोहदा येथील प्रकाशभाऊ कुतरमारे यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असता या शेतकऱ्यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सरकारने केली आहे.
सध्या दुष्काळग्रस्त शेतकरी तुरीचे व कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी झाल्याने त्रस्त असून सरकारी खरेदी होत नसल्याने व्यापारी मंदीचा हवाला देत लूटत आहेत, विदर्भात या महिन्यात आणखी ५८ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी कर्जबाजारी व सतत नापिकीला तसेच भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने लोकसभा व विधानसभेत सातबारा कोरा करणे व लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव देण्याचे आश्वासन पूर्ण करणे तिजोरी खाली असल्यामुळे शक्य झाले नाही. त्यामुळेच ह्या आत्महत्या झाल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिकारी मात्र शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती सरकारला देत नाहीत. सरकारी मदतही तटपुंजी देण्यात येत असून त्यातही विलंब करीत असल्याचा आरोप विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला .
सरकारने घोषित केलेली मदतही मिळत नसल्याच्या आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला असून म्दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान, संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू करावी, सर्व उपासमारीला तोंड देत असलेल्या गावातील शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना तत्काळ लागू करावी, सर्व शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून १०० दिवस प्रति एकरी द्यावे तसेच सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान तात्काळ देण्यात यावे या मागण्यांची पूर्तता त्वरित न झाल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता विदर्भ जनआंदोलन समितीने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)