शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मृत वाघाचे अवयव चोरणाऱ्या चौघांना बेड्या ; वनविभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:47 IST

Yavatmal : वेकोलिचे कर्मचारीच निघाले आरोपी

वणी (यवतमाळ) : उकणी कोळसा खाणीत विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मृत वाघाचे सुळे दात व नखे घटनास्थळावरून लंपास करण्यात आली होती. याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून गुरुवारी रात्री चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून चार दात आणि काही नखे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत.

अंदाजे तीन ते चार वर्षे वय असलेल्या या वाघाच्या मृत्यूची घटना उघडकीस येण्यास १२ ते १३ दिवस लागले. ज्या ठिकाणी वाघाचा मृत्यू झाला, त्या ठिकाणी बोअरवेल होती. या बोअरवेलच्या डीपीचा करंट लागून त्या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. वाघाचे दात आणि नखे गायब असल्यामुळे ते पळविले कुणी, याचा तपास वनअधिकाऱ्यांनी सुरू केला होता.

दोघांना वनकोठडी, तर दोघांना जामीन या प्रकरणातील आकाश धानोरकर व सतीश मांढरे या दोघांना न्यायालयाने जामीन दिला, तर नागेश हिरादेवे व रोशन देरकर या दोघांना वनकोठडी सुनावण्यात आली आहे. वाघाचे अवयव पळविण्याच्या घटनेचा उलगडा झाला असला तरी वाघाच्या मृत्यूची जबाबदारी वनविभागाने अद्याप कुणावर निश्चित केलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीवYavatmalयवतमाळ