गावाच्या विकासासाठी मतभेद विसरा
By Admin | Updated: June 5, 2017 01:18 IST2017-06-05T01:18:41+5:302017-06-05T01:18:41+5:30
गावाचा विकास हा आपसी मतभेदामुळे रखडतो. त्यामुळे नागरिकांनी आपसी मतभेद विसरून विकासासाठी एकत्र यावे, ...

गावाच्या विकासासाठी मतभेद विसरा
माधुरी आडे : बोरगाव-भंडारी येथे विकास कामांचे भूमिपूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : गावाचा विकास हा आपसी मतभेदामुळे रखडतो. त्यामुळे नागरिकांनी आपसी मतभेद विसरून विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी केले.
बोरगाव-भंडारी जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदच्या माजी सदस्य मीनाक्षी राऊत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आर्णी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अनिल आडे, ज्योती उपाध्ये, पंचायत समिती सदस्य रोहिदास राठोड, गटविकास अधिकारी सी.जी. चव्हाण उपस्थित होते. यावेळी आसरा, परसोडा, तेंडोळी, आमनी, सातारा, महाळुंगी, सायखेडा या ठिकाणी सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना माधुरी आडे म्हणाल्या, गावातील रस्ते, नाली, पिण्याचे पाणी, शौचालय आदी समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहो. तुमच्या गावात अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क करा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अतुल पाटील, संदीप उपाध्ये, अमोल देशमुख, बांधकाम अभियंता वसंत भोकरे, उत्तम राठोड, आसराच्या सरपंच रूपाली भगत, उपसरपंच कैलास वानखडे आदी उपस्थित होते.