शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

धनापेक्षा वन महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 10:17 PM

वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा असमतोल, ग्लोबल वार्मिंग आदींचा विचार केला असता आयुष्यात वन मोठे की धन मोठे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जगातील संपूर्ण संपत्ती गोळा केली तरी सहा महिन्याचे आॅक्सिजन आपण विकत घेऊ शकत नाही.

ठळक मुद्देमदन येरावार : आॅक्सिजन पार्क येथे वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा असमतोल, ग्लोबल वार्मिंग आदींचा विचार केला असता आयुष्यात वन मोठे की धन मोठे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जगातील संपूर्ण संपत्ती गोळा केली तरी सहा महिन्याचे आॅक्सिजन आपण विकत घेऊ शकत नाही. मात्र झाडे आपल्याला आयुष्यभर मोफत आॅक्सिजन देतात. त्यामुळे जगण्यासाठी धना पेक्षा वन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी येथे केले.शहरालगत वन विभागाच्यावतीने साकारण्यात आलेल्या आॅक्सीजन पार्कमध्ये १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, खासदार भावना गवळी, नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य वनसंरक्षक प्र.गं.राहूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, उपवनसंरक्षक रमेशकुमार, डॉ. भानुदास पिंगळे उपस्थित होते. पालकमंत्री येरावार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवड मोहीम एक लोकचळवळ म्हणून गावागावात रुजविली आहे. निसर्ग जोपासना व पर्यावरण समतोलासाठी राष्टÑीय वनधोरणानुसार ३३ टक्के वन आवश्यक आहे. राज्यात हे प्रमाण २० टक्के असून १३ टक्क्यांची कमतरता आपल्या भरुन काढायची आहे. त्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आॅक्सीजन पार्कचे शहरात सुंदर नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांसाठी आवश्यक त्याबाबींची पूर्तता करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, दुष्काळ, पाणीटंचाई आपण प्रत्यक्ष अनुभवली आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे वृक्ष लागवड होय. गत दोन वर्षात जिल्ह्याने वृक्ष लागवडीचे चांगले उद्दीष्ट गाठले. यावर्षी जिल्ह्यात ५९.१७ लक्ष उद्दीष्ट देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी फ्री मेथॉडिस्ट इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी बोधीसत्व खंडेराव याने सीडबॉलचे महत्व सांगितले. प्रास्ताविक उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे, संचालन प्रांजली दांडगे तर आभार कुशल रंगारी यांनी मानले. कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, संदीप महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, तहसीलदार सचिन शेजाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांच्यासह शहरातील ४४ विविध संघटनांचे प्रतिनिधी, १२ शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :forest departmentवनविभागMadan Yerawarमदन येरावार