शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार ताटाऐवजी कागदावरच, विद्यार्थ्यांना मुख्य घटकच मिळेना...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 17:37 IST

केळीचाही पुरवठा नाही : महागाईच्या तुलनेत अनुदान नाही, आरोग्य कसे सुधारणार?

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शालेय पोषण आहारात आता अंडी व केळी अशा पूरक आहाराचा समावेश केला आहे. त्यासाठी प्रतिविद्यार्थी पाच रुपयांचा खर्च करावा, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र, सध्या साडेपाच ते सहा रुपयांपेक्षा कमी किमतीत अंडी मिळत नाही. गावरान अंड्याची किंमत दहा रुपयांपर्यंत आहे. परिणामी, तीन महिने उलटूनही पोषण आहारात विद्यार्थ्यांना अंडी मिळाली नाहीत, तर दुसरीकडे वणी शहर व तालुक्यात अनेक शाळांना केळी एकदाच दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकूणच अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचे वितरण कागदावरच होत असल्याचे दिसून येत आहे.

वणी तालुक्यात नगरपालिका आणि अनुदानित अशा १४५ शाळांना पोषण आहार पुरविण्यात येत आहे. या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीतील १२ हजार १०४ विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. शासनाच्या नवीन निर्णयानुसार, दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर पोषण आहारात शहरातील पात्र शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यास आठवड्यातील प्रत्येक बुधवार किंवा शुक्रवारी एक अंडे आणि अंडी न खाणाऱ्यांना केळी देण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत; पण बहुतेक शाळांनी केळी स्वस्त असूनही आणि परंतु पण बहुतेक शाळांनी केळी स्वस्त असूनही महिन्यातून एकदाच केळी दिल्याची माहिती अनेक मुख्याध्यापकांनी दिली. अंड्याची किंमत सहा ते सात रुपये शिजवायचा खर्च वेगळाच, अशीही स्थिती पाहायला मिळाली; दुसरीकडे खर्च जास्त येत असल्याने पुरवठाधारकांनी अंड्याचे नियोजन टाळल्याचे दिसून येत आहे; पाच रुपयांत ना फळ ना अंडे मिळते. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत अप्रत्यक्षरीत्या अडचणी निर्माण होत आहेत.

शासनाचा आदेश काय म्हणतो?शासनाच्या ७ नोव्हेंबर २०२३ च्या नवीन आदेशानुसार प्रतिविद्यार्थी नियमित पोषण आहाराव्यतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थासाठी पाच रुपयेच खर्च करायचेआहेत. विद्यार्थ्यांना अंडी व केळी देण्यात येणार आहेत. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असणारे फळ द्यावे, असे आदेशात म्हटले आहे.  बहुतेक शाळांनी विद्यार्थ्यांना अंडे, अंडा बिर्याणी- पुलाव व फळे द्यावी, असे आदेशात स्पष्ट केले.

"शासनाच्या आदेशाप्रमाणे तर देणे आवश्यकच आहे. एखादा मुख्याधापक देत नसेल, तर त्याला त्याचे कारण विचारल्या जाईल, कारण संयुक्तिक असेल तर ठीक नसेल तर नियमानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल." - स्नेहदीप काटकर, गटशिक्षणाधिकारी, वणी. 

टॅग्स :Schoolशाळाgovernment schemeसरकारी योजनाYavatmalयवतमाळ