कुपोषित बालकांचे ‘एनर्जी फूड’ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST2019-12-25T05:00:00+5:302019-12-25T05:00:04+5:30

एनर्जी फूड’चे पाच कट्टे मंगळवारी सकाळी येथे रस्त्यावर आढळल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे. अंगणवाड्यांमार्फत या वस्तूचे वितरण बालकांना केले जाते. फेकलेले कट्टे नेमके कुठले असावे याचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे. येथील बसस्थानकाच्या कॉर्नरवर हा प्रकार आढळून आला. ज्या भागात कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे तेथे ‘एनर्जी डेन्स न्युट्रिशिअस फुडस्’चा पुरवठा अंगणवाड्यांमार्फत केला जातो. रस्त्यावर पडून असलेले हे फूडस् कुणी आणि का टाकले याविषयी विविध चर्चा आहे.

'Food Food' of malnourished children on the road | कुपोषित बालकांचे ‘एनर्जी फूड’ रस्त्यावर

कुपोषित बालकांचे ‘एनर्जी फूड’ रस्त्यावर

ठळक मुद्देपाच कट्टे आढळले : नेर येथे विविध चर्चांना ऊत

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : कुपोषित बालकांसाठी असलेले ‘एनर्जी फूड’चे पाच कट्टे मंगळवारी सकाळी येथे रस्त्यावर आढळल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे. अंगणवाड्यांमार्फत या वस्तूचे वितरण बालकांना केले जाते. फेकलेले कट्टे नेमके कुठले असावे याचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे.
येथील बसस्थानकाच्या कॉर्नरवर हा प्रकार आढळून आला. ज्या भागात कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे तेथे ‘एनर्जी डेन्स न्युट्रिशिअस फुडस्’चा पुरवठा अंगणवाड्यांमार्फत केला जातो. रस्त्यावर पडून असलेले हे फूडस् कुणी आणि का टाकले याविषयी विविध चर्चा आहे.
महाराष्ट्र  शासनातर्फे एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत कुपोषित बालकांसाठी या वस्तूंचा पुरवठा होतो. रस्त्यावर आढळलेले फूडस् तयार झाल्याची तारीख २९ जुलै २०१९ अशी आहे. मुदत संपण्याला आणखी काही कालावधी शिल्लक आहे. तरीही या वस्तूंची अशा प्रकारे विल्हेवाट लावण्यामागे काय उद्देश असावा यामागील कोडे कायम आहे.

सावरगाव काळे, हनुमाननगर नेर व पंचायत समिती परिसरात असलेल्या अंगणवाडीची पाहणी करण्यात आली. तेथील वस्तूचे वाटप झाले आहे. रस्त्यावर फेकण्यात आलेला माल कुठला आहे हे सांगता येत नाही.
- संजीवनी ओंकार
प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी, नेर.

Web Title: 'Food Food' of malnourished children on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न