दिग्रस तालुक्यात चाराटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 21:54 IST2019-03-18T21:53:37+5:302019-03-18T21:54:09+5:30

तीन वर्षांपासून दुष्काळ असल्याने तालुक्यात भीषण चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांनी मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीस काढली असली तरी ग्राहक शोधूनही सापडत नाही. संकटकाळी पशुधन विकून काम भागविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.

Fodder scarcity in Digras taluka | दिग्रस तालुक्यात चाराटंचाईचे संकट

दिग्रस तालुक्यात चाराटंचाईचे संकट

ठळक मुद्देदुष्काळामुळे पशुधन वाऱ्यावर : बाजारात गुरांची गर्दी, मात्र ग्राहक शोधूनही मिळेना

प्रकाश सातघरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : तीन वर्षांपासून दुष्काळ असल्याने तालुक्यात भीषण चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांनी मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीस काढली असली तरी ग्राहक शोधूनही सापडत नाही. संकटकाळी पशुधन विकून काम भागविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.
तालुक्यातील सर्वच गावांमध्ये विहिरी, नदी, नाले कोरडे पडले आहे. पाण्याचे संकट भीषण झाले आहे. त्यातच गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पीक उत्पादन घटले आहे. रबी हंगामात अनेकांनी शेती पडीत ठेवली. त्यामुळे जनावरांसाठी वैरण निर्मिती झाली नाही. आता उन्हाळा सुरू होताच पशुपालकांना चाराटंचाईचाही सामना करावा लागत आहे. नाईलाजाने जीवापाड जपलेली बैलजोडी विकण्याचा प्रसंग ओढवला आहे. शासनाने गोवंशाची हत्त्या करण्यावर बंदी घातल्यामुळे जनावरांची खरेदी बरीच कमी झाली आहे. दिग्रससह जिल्ह्यातील नेरच्या बाजारात जनावरे मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे.

भाव घसरले
एकंदर दुष्काळामुळे बाजारात जनावरांचे भावही घसरले आहे. साधारणत: ७० ते ८० हजार किमत असलेली बैलजोडी आता ४० ते ५० हजार रुपयांना विकली जात आहे.

चारा नाही, पाणी नाही. त्यामुळे बैलजोडी विक्रीला आणली. मात्र ग्राहकच सापडत नाही. या टंचाईचा आणखी किती दिवस सामना करावा.
- महादेव भालेराव
पशुपालक, फेट्री

Web Title: Fodder scarcity in Digras taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.