फुलसावंगीत चक्काजाम

By Admin | Updated: June 21, 2015 00:11 IST2015-06-21T00:11:03+5:302015-06-21T00:11:03+5:30

रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या फुलसावंगी येथील ..

Flushing suit | फुलसावंगीत चक्काजाम

फुलसावंगीत चक्काजाम

रस्ता दुरुस्ती : महागाव-फुलसावंगी रस्त्याची चाळणी
फुलसावंगी : रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या फुलसावंगी येथील तरुणांनी महागाव-फुलसावंगी मार्गावर शनिवारी चक्काजाम आंदोलन केले. तीन तासाच्या आंदोलनानंतर रस्ता दुरुस्तीला सुरुवात झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
महागाव-फुलसावंगी रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असे म्हणण्याची वेळ आली आहे. फुलसावंगीपासून ५०० मीटर अंतरावर रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. शाळकरी मुलांना चालणे कठीण झाले आहे. किरकोळ अपघात नित्याची बाब झाली आहे. याबाबत वारंवार निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. दोन दिवसापूर्वी गावातील ग्राम स्वच्छता अभियानातील तरुणांनी रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन देऊन चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता.
मात्र बांधकाम विभागाने या निवेदनाची दखल घेतली नाही. त्यामुळे गावातील विविध संघटनांच्या तरुणांनी फुलसावंगी, महागाव मार्गावर शनिवारी सकाळी चक्काजाम आंदोलन सुरू केले. तरुणांनी रस्त्यावर ठिय्या दिला. यामुळे रस्त्याच्या दोनही कडेला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाची दखल घेऊन महागाव ठाणेदार प्रकाश शेळके, पोलीस उपनिरीक्षक नितीन चरडे, जमादार आनंदा चंदेवाड यांनी आंदोलनस्थळ गाठून तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु जोपर्यंत कामाला सुरुवात होत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रमोद खराबे फुलसावंगी येथे दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत रस्ता दुरुस्तीला सुरुवात झाली. (प्रतिनिधी)

तीन तासांच्या आंदोलनानंतर रस्ता दुरुस्तीला सुरुवात
फुलसावंगी येथील तरुणांनी रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलनाचे शस्त्र उपसले. फुलसावंगी-महागाव रस्त्यावर ठिय्या दिला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता प्रमोद खराबे तत्काळ फुलसावंगीत दाखल झाले. जेसीबीला पाचारण करून रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली. बांधकाम विभागाने ही तत्परता आधीच दाखविली असती तर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना तीनतास ताटकळावे लागले नसते.

Web Title: Flushing suit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.