कळंब येथे आगीत तीन घरे भस्मसात
By Admin | Updated: February 9, 2016 02:06 IST2016-02-09T02:06:17+5:302016-02-09T02:06:17+5:30
येथील प्रेमनगर परिसरात लागलेल्या आगीत तीन घरे जळून भस्मसात झाली.

कळंब येथे आगीत तीन घरे भस्मसात
वासराचा मृत्यू : एक लाखावर नुकसान
कळंब : येथील प्रेमनगर परिसरात लागलेल्या आगीत तीन घरे जळून भस्मसात झाली. तर एक वासरु आणि कोंबड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही आग सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास लागली. गावकरी आणि अग्नीशमन दलाने या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला.
या आगीत अनिल नारायण येकणार यांचे घर जळून भस्मसात झाले. त्यात रोख ३५ हजार रुपये व मौल्यवान साहित्य असे ७० हजारांचे नुकसान झाले. तसेच एक वासरु आणि तीन कोंबड्याही मृत्युमुखी पडल्या. लगतचे सुधाकर मोरे आणि तुळशीराम मोरे यांच्या घरालाही आगीची झळ पोहोचली. आग लागताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीवर काही वेळातच नियंत्रण मिळविण्यात आले. आगीची माहिती मिळताच तहसीलदार संतोष काकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगग्रस्तांना शासकीय मदत आणि धान्याचे वाटप करण्यात आले. आग आटोक्यात आणण्यासाठी नगराध्यक्ष दिगंबर मस्के, उपाध्यक्ष मनोज काळे, बांधकाम सभापती आशिष धोबे, पोलीस उपनिरीक्षक संघरक्षक भगत, नगरसेवक राजू पड्डा, मारोती वानखडे, योगेश धांदे, समीर शेख आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)