थेट नगराध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा

By Admin | Updated: October 21, 2016 02:11 IST2016-10-21T02:11:05+5:302016-10-21T02:11:05+5:30

थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असल्याने त्यांचा कार्यकाळ आणि अविश्वास प्रक्रियेसंदर्भातील संभ्रम दूर झाला आहे.

Five years of direct municipal term | थेट नगराध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा

थेट नगराध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा

निवडणूक विभाग : दोन वर्षानंतर आणता येणार अविश्वास
यवतमाळ : थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असल्याने त्यांचा कार्यकाळ आणि अविश्वास प्रक्रियेसंदर्भातील संभ्रम दूर झाला आहे. नगराध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा राहणार आहे असून दोन वर्षानंतर अविश्वास आणता येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली.
राज्य शासनाने नगरपरिषदेत स्थिर सत्ता देण्यासाठी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ५ आक्टोबर रोजी आरक्षण काढण्यात आले. मात्र त्यानंतरही अध्यक्षपदाचा कार्यकाळी किती वर्षांचा राहणार, थेट जनतेतून आल्याने नगराध्यक्ष, नगरसेवकांना उत्तरदायी राहणार की नाही, याबाबत संभ्रम होता. नगराध्यक्ष थेट जनेतून असला तरी त्यांना सभागृहात बहुमतानेच निर्णय घ्यावा लागणार आहे. सदस्यांना दोन तृतीयांश बहुमताने अविश्वास आणता येणार आहे.
यवतमाळ शहरासह जिल्ह्यात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याचे देशमुख यांनी जाहीर केले. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्र आयोगाने दिलेल्या वेब साईटवर भरावयाचा आहे. त्यानंतर या अर्जाची प्रिन्ट काढून तो अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जमा करावयाचा आहे. हे नामनिर्देशन पत्र २९ सप्टेंबरला दुपारी ३ वाजतापर्यंत स्वीकारण्यात येईल. नंतर छाननी, नामांकन मागे घेणे आणि प्रत्यक्ष मतदान २७ नोव्हेंबरला होणार आहे. दुसऱ्याच दिवशी २८ नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
यवतमाळात एकूण २८५ मतदार केंद्र राहणार आहे. शहरात मतदारांची संख्या दोन लाख ३३ हजार ४०५ असून त्यात एक लाख १९ हजार ६८८ पूरश, तर एक लाख १३ हजार ६९९ महिला आणि इतर १८ मतदार आहे. २८ प्रभागातील प्रत्येक मतदान केंद्रावर ८०० ते ८५० इतकेच मतदार राहणार आहे. मतदाराला दोन बॅलेट युनिटमध्ये तीन मतदान करायचे आहे. पहिले बॅलेट युनिट नगरसेवकांसाठी असून तेथे दोन बटन दाबायचे आहे. नगराध्यक्षासाठीच्या बॅलेट युनिटमध्ये एक बटन दाबायचे आहे. या दोन्ही युनिटमध्ये नोटाचे बटन देण्यात आले असून मतदारांचा नकाराधिकार कायम ठेवण्यात आला आहे.
शहरात आदर्श अचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यकरिता चार पथक तयार करण्यात आले आहे. या सोबतच व्हिडीओग्राफी सर्व्हेलियन्स पथक राहील.
या पथकात चार कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर आणि एक पोलीस अधिकारी राहील. आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार देण्यासाठी १८००२३३६३५८ टोल फ्री क्रमांक आहे. शहरातील आर्णी रोड, पाढंरकवडा रोड, बाभूळगांव रोड, दारव्हा रोड या चार ठिकाणी चेकपोस्टच्या माध्यमातून दारू, पैसा, प्रचार साहित्य, अवैध शस्त्र यावर पाळत ठेवली जाईल्. उमेदवारांना तहसीलमध्ये वाहन परवाना, प्रचार कार्यालय परवाना, फ्लॅक्स, बॅनर परवाना, सभा, लाउडस्पिकर, मिरवणूक आदी परवानगी घेण्यासाठी एक खिडकीची व्यवस्था करण्यात आल्याचे राजेंद्र देशमुख यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Five years of direct municipal term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.