पाच वर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू

By Admin | Updated: October 9, 2014 23:09 IST2014-10-09T23:09:15+5:302014-10-09T23:09:15+5:30

बुधवारपासून बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय बालकाचे प्रेत शहरानजीक असलेल्या मांगुर्डा शिवारातील एका विहिरीत आढळून आले.

The five-year-old child fell into well in the well | पाच वर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू

पाच वर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू

पांढरकवडा : बुधवारपासून बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय बालकाचे प्रेत शहरानजीक असलेल्या मांगुर्डा शिवारातील एका विहिरीत आढळून आले.
लकी शंकर कुळसंगे (५) बेतावार ले-आऊट पांढरकवडा असे मृत बालकाचे नाव आहे. तो बुधवारी दुपारी ३ वाजतापासून बेपत्ता होता. घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता थांगपत्ता लागला नाही. दरम्यान गुरुवारी त्यांच्या एका शेजाऱ्याला एका विहिरीत बालकाचे प्रेत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे घरच्यांनी मांगुर्डा शिवारामधील नितीन नार्लावार यांच्या शेतात धाव घेतली. त्यावेळी लकीचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. याबाबत मृतक बालकाचे आजोबा बंडू काशिनाथ सोयाम यांनी पोलिसांत तक्रार दिली.
सदर मुलगा हा मतिमंद होता व वारंवार तो घरून निघून जात होता, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तूर्तास पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. अधिक तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हा बालक नेमका येथे कसा गेला, याचा शोध पोलीस घेत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The five-year-old child fell into well in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.