मुन्नाच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST2021-08-14T04:47:36+5:302021-08-14T04:47:36+5:30
फुलसावंगी : येथील शेख इस्माईल ऊर्फ मुन्ना या प्रयोगशील तरुणाचे अपघाती निधन झाले. त्याच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी शुक्रवारी ...

मुन्नाच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत
फुलसावंगी : येथील शेख इस्माईल ऊर्फ मुन्ना या प्रयोगशील तरुणाचे अपघाती निधन झाले. त्याच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी शुक्रवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी भेट दिली. त्यांनी मुन्नाच्या कुटुंबाला तातडीने पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली.
शेख इस्माईल शेख इब्राहिम ऊर्फ मुन्ना व सध्या ‘मुन्ना हेलिकॉप्टर’ या टोपणनावाने ओळखला जाणाऱ्या प्रयोगशील तरुणाने हेलिकॉप्टरची निर्मिती केली होती. ते हेलिकॉप्टर एअर ॲब्युलन्स किंवा शेतीसाठी फवारणी यंत्र म्हणून वापरण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, दुर्दैवाने हेलिकॉप्टरची चाचणी घेताना झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. या अपघाताने केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर देशाचे नुकसान झाल्याच्या भावना नितीन भुतडा यांनी व्यक्त केल्या.
मुन्नाच्या कुटुंबाला त्यांनी भाजपतर्फे पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. शेख इस्माईलच्या निधनानंतर अनेक राजकीय नेते मुन्नाच्या कुटुंबाला भेट देत आहेत. शुक्रवारी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, आमदार ॲड. नीलय नाईक, आमदार नामदेव ससाणे व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.