शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

विदर्भात दोन दिवसांत पाच शेतकऱ्यांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 11:15 IST

कर्जवाटप केवळ ४५ टक्के : नापिकी, कर्जवाटप थांबले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदर्भात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. मागील दोन दिवसांत विदर्भात पाच शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. यामध्ये यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन आणि भंडारा जिल्ह्यात एका घटनेचा समावेश आहे. यामागे गतवर्षी झालेली नापिकी, न मिळालेली मदत आणि या वर्षी बँकांनी रोखलेले कर्जवाटप आदी कारणे असल्याचे शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

मागील ४८ तासांत विनोद ढोरे (रा.दाभेविरली, जि.भंडारा), भोजराज राऊत (रा.चोरटी) व नीलकंठ प्रधान (रा.रणमोचन), जि. चंद्रपूर, बन्सी पवार (रा. गांधीनगर) व दादाराव बोबडे (रा. गगनमाळ) जि. यवतमाळ या पाच जणांनी आत्महत्या केली. या वर्षी जूनपर्यंत पश्चिम विदर्भात ६९४, तर पूर्व विदर्भात २२८ शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली. 

विदर्भात आतापर्यंत केवळ ४५ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. मागील हंगामात प्रचंड नापिकी झाली, कापूस आणि सोयाबीनला भाव मिळाला नाही. त्यातच दुष्काळ घोषित करण्यात केला नाही. पीकविमाही समाधानकारक मिळाला नाही. यामुळे पश्चिम विदर्भापाठोपाठ आता पूर्व विदर्भातही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असल्याचे किशोर तिवारी यांनी कळविले.

अमरावतीत पाच महिन्यांत १४३ घटनामागील तीन वर्षातील सरकारी आकडेवारीनुसार, अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढत चालला आहे. या वर्षी मे महिन्यापर्यंत अमरावती जिल्ह्यात १४३ शेतकरी आत्महत्या झाल्या. अमरावती जिल्ह्यात लागवडीखाली कापूस आणि सोयाबीनचा पट्टाही आहे. या जिल्ह्याच्या काही भागात नागपूर संत्र्याचीही लागवड होते. यवतमाळ जिल्ह्यात मे २०२४ पर्यंत १३२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी २०१५ ते २०२१ पर्यंत एकात्मिक कार्यक्रम सरकारकडे सादर करण्यात आला होता, अशी माहिती किशोर तिवारी यांनी दिली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रYavatmalयवतमाळVidarbhaविदर्भ