यवतमाळात जिल्ह्यात एकाच दिवशी रोखले पाच बाल विवाह; आठ लग्न एकाच मंडपात

By सुरेंद्र राऊत | Published: April 22, 2024 07:31 PM2024-04-22T19:31:45+5:302024-04-22T19:32:32+5:30

आठ लग्न एकाच मंडपात; पाच नववधू आढळल्या अल्पवयीन 

Five child marriages stopped in Yavatmal district on a single day | यवतमाळात जिल्ह्यात एकाच दिवशी रोखले पाच बाल विवाह; आठ लग्न एकाच मंडपात

यवतमाळात जिल्ह्यात एकाच दिवशी रोखले पाच बाल विवाह; आठ लग्न एकाच मंडपात

यवतमाळ: जिल्हा बाल संरक्षण कक्षाने साेमवारी रेकाॅर्ड ब्रेक कारवाई केली. एकाच दिवशी पाच मुलींचे बालविवाह राेखण्यात त्यांना यश आले. बालविवाह हाेत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली. पिंपळशेंडा ता. पांढरकवडा येथे आठ बाल विवाह नियोजित आहे असे सांगण्यात आले. याच माहितीच्या आधारावर तातडीने नववधूच्या वयाची शहानिशा केली असता ५ बालिका या अल्पवयीन असल्याचे पुढे आले. या पाच बालिकांचे विवाहन राेखण्यात आले.

ही कारवाई जिल्हा महिला बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे मार्गदर्शनात करण्यात आली. कुटुंबातील पालकांना मुलींचा विवाह वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी न करण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. अल्पवयात लग्न लावून दिल्यास व त्यास सहकार्य करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्यांना एक लाख रुपये दंड व दोन वर्षे कारावास होऊ शकते याबाबत माहिती देण्यात आली. साेबतच पालकांकडून मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न करणार असे, लेखी हमीपत्र घेण्यात आले.

बाल कल्याण समिती कक्षाने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यामध्ये एकूण २४ बाल विवाह रोखले आहे. मे महिन्यात १० तारखेला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर अनेक बाल विवाह होतात, म्हणून विविध माध्यमाद्वारे बाल विवाह प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक नियोजित बाल विवाहाची जिल्हा बाल संरक्षण कक्षास मिळत आहे.

साेमवारी केलेल्या कारवाईत घाटंजी ठाणेदार निलेश सुरटकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर मावस्कर, पोलीस कर्मचारी निलेश घोसे, बाल संरक्षण अधिकारी माधुरी पावडे, क्षेत्रीय कार्यकर्ता कोमल नंदपटेल, चाईल्ड लाईन सुपरवायझर गणेश आत्राम सहभागी झाले हाेते.

Web Title: Five child marriages stopped in Yavatmal district on a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.