पहिल्या टप्प्यात ५५ अतिक्रमणे भुईसपाट
By Admin | Updated: May 14, 2016 02:31 IST2016-05-14T02:31:30+5:302016-05-14T02:31:30+5:30
अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पहिल्या टप्यात ५५ अतिक्रमणे भुईसपाट करण्यात आली.

पहिल्या टप्प्यात ५५ अतिक्रमणे भुईसपाट
यवतमाळात मोहीम : आर्णी मार्गावर कारवाई
यवतमाळ : अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पहिल्या टप्यात ५५ अतिक्रमणे भुईसपाट करण्यात आली. सलग दोन दिवस मोहीम राबविल्यानंतर पहिला टप्पा संपला. आर्णी मार्गावर ही कारवाई करण्यात आली. यामुळे रस्त्यांवर वाहनांची होणारी कोंडी फुुटली.
यवतमाळच्या उपविभागीय महसूल अधिकारी निमा अरोरा यांनी शहरातील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला प्रारंभ केला होता. गुरूवार आणि शुक्रवार असे दोन दिवस ही मोहीम शहरात राबविली जाणार आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. दोन दिवसात ५५ अतिक्रमणे काढण्यात आली.
शुुक्रवारी सकाळपासून आर्णी मार्गावरील अतिक्रमण काढण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. आर्णी मार्गावर दुतर्फा असलेले अतिक्रमण काढण्यात आले. यामुळे पादचाऱ्यांसाठी रस्ता मोकळा झाला. या ठिकाणी बंद असलेल्या नाल्यांचा मार्ग मोकळा करण्यात आला. आर्णी नाक्यापर्यंत ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. (शहर वार्ताहर)