४१०० रूपये भाव : सर्वाधिक खरेदी पुसद केंद्रावरयवतमाळ : पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू होताच व्यापाऱ्यांनी कापसाचे दर कमी केले. यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस पणन महासंघाच्या केंद्राकडे वळता केला.शुभारंभाला जिल्ह्यात दोन केंद्रावर १००० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.यवतमाळ, पुसद आणि वणी केंद्रावर शुक्रवारी पणन महासंघाने कापूस खरेदीचा शुभारंभ केला. यवतमाळच्या गायत्री कॉटन जिनिंगमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. महासंघाने ४१०० रूपये दर कापसाला दिला. तर व्यापाऱ्यांनी ३९०० ते ४००० रूपये क्विंटलचा दर कायम केला. यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस पणन महासंघाला विकला. यवतमाळात ४५० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. तर पुसद केंद्रावर ६०० क्विंटल कापसाची खरेदी झाली. पणन महासंघ शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार आहे. तीन दिवसांत हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची पसंती पणनच्या केंद्राकडे आहे. कापूस खरेदी केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी पणनचे सदस्य सुरेश चिंचोळकर, बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
शुभारंभाला आला १००० क्विंटल कापूस
By admin | Updated: November 7, 2015 02:34 IST