शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकादशीला तयारी अन् द्वादशीला वारी; कुठे बैलबंडीवर वरात, तर कुठे डीजे लावून चिमुकल्यांची मिरवणूक

By अविनाश साबापुरे | Updated: June 30, 2023 17:44 IST

शाळा भरली : शाळेच्या पहिला दिवसाला अत्यंत उत्साहात सुरुवात

यवतमाळ : तब्बल दोन महिन्यांची उन्हाळी सुटी संपवून शुक्रवारी जिल्ह्यातील शाळा पोरांच्या गर्दीने, शिक्षकांच्या उत्साहाने भरल्या. गुरुवारी आषाढी एकादशी असतानाही शिक्षकांनी शाळांच्या सजावटीची तयारी केली अन् शुक्रवारी द्वादशीला वाजतगाजत चिमुकल्या विद्यार्थ्यांची वारी शाळेत दाखल झाली. अनेक गावांमध्ये अक्षरश: बैलबंडी सजवून त्यात विद्यार्थ्यांना आणले गेले. तर काही उत्साही शिक्षकांनी चक्क डीजे लावून नाचत नाचत विद्यार्थी शाळेपर्यंत आणले. शाळेचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात सुरू झाल्याचे जिल्हाभरातील चित्र होते.

गेल्या २० एप्रिलपासून शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या होत्या. आता २०२३-२४ या नव्या शैक्षणिक सत्राला ३० जूनपासून प्रारंभ झाला. त्यानिमित्त सर्व शाळांमध्ये ‘प्रवेशोत्सवा’चा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी डाॅ. जयश्री राऊत यांच्या नियोजनानुसार अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी दिल्या. पहिल्या दिवशी नाचगाणे, गप्पा गोष्टी अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबाबत आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रप्रमुख मधुकर काठोळे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांची बैलबंडीवर मिरवणूक काढण्यात आली. यवतमाळ शहरातील अँग्लो हिंदी शाळेत स्वत: शिक्षणाधिकारी डाॅ. जयश्री राऊत आणि शिक्षण उपनिरीक्षक योगेश डाफ यांनी प्रवेशात्सवात सहभाग घेतला. या अधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचा संच देण्यात आला. कळंब तालुक्यातील सुकळी गावात डीजे लावून, विद्यार्थ्यांना ब्लेझर घालून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. मुख्याध्यापक अमोल पाटेकर, शिक्षक संदीप कोल्हे यांच्या उत्साहातून ही मिरवणूक लक्षवेधी ठरली. 

आईबाबा बी संगतीला हाय...ताई दादा बी संगतीला हाय...गुरुजी बी संगतीला हाय.. अन् बाई बी संगतीला हाय...सोनू तुझ्या शिक्षणाची रे... आता तयारी करायची हाय..!

हे गोण डीजेवर वाजत असताना विद्यार्थ्यांनीही ताल धरला होता. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप दरणे, उपाध्यक्ष शशिकांत जाधव, ग्रामपंचायत सदस्या आनंद मांढरे, अर्चना थूल यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाने पहिला दिवस साजरा करण्यात आला. अंबिकानगरातील नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक सहामध्ये मुख्याध्यापिका करुणा खैरे, मनोहरपंत भिसे, प्रतीभा शेळके, रेखा वरखडे, संजय चुनारकर, शाळा व्यस्वस्थापन समिती अध्यक्ष विभा कामठे आदींच्या हस्ते नवगताचे स्वागत करून पाठ्यपुस्तक, दप्तर वाटप करण्यात आले. हाच उत्साह बोरगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही पाहायला मिळाला. येथे गणवेश, पुस्तक, पेन, वही देऊन विद्यार्थ्यांसह छायाचित्रण करण्यात आले. तसेच मनपूरच्या जिल्हा परिषद शाळेत जिल्हाधिकारी अमोल येडगे, सीईओ श्रीकृष्ण पांचाळ, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्या उपस्थितीत डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटन करण्यात आले. 

जिल्हाधिकारी, सीईओंनी वाटप केले पुस्तक

शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी अमोल येडगे, सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी मडकोना आणि मनपूर येथील शाळांना भेटी दिल्या. अधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, गणवेश व पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वत:चा परिचय करून दिला, घरातील व्यक्तींची नावे सांगितली. उन्हाळी सुट्टीत केलेल्या सहशालेय कृती, गावाबद्दल माहिती याबाबत चर्चा केली. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी राजू मडावी, सहाय्यक बीडीओ किशोर गोळे, बीईओ विद्या वैद्य, विस्तार अधिकारी शिल्पा पोटपल्लीवार, केंद्रप्रमुख शहाजी घुले, केंद्रप्रमुख थोटे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष उषा गोटे, मुख्याध्यापक हिरामण भुरे, शिक्षक रवींद्र तामगाडगे, सीमा मंगाम, ललिता मरसकोले, दीपक चौधरी, देवानंद सोयाम व वंदना शिरभाते उपस्थित होते.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीSchoolशाळाYavatmalयवतमाळSocialसामाजिक