आगीत १२ लाखांचा कापूस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:15 IST2017-12-12T22:15:35+5:302017-12-12T22:15:48+5:30
धामणगाव मार्गावरील बजाज कॉटन जिनींगमध्ये मंगळवारी सकाळी कापसाच्या गंजीला आग लागली. यात १२ लाखांचा कापूस जळाला. अगिशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.

आगीत १२ लाखांचा कापूस खाक
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : धामणगाव मार्गावरील बजाज कॉटन जिनींगमध्ये मंगळवारी सकाळी कापसाच्या गंजीला आग लागली. यात १२ लाखांचा कापूस जळाला. अगिशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.
बजाज कॉटन जिनींगमध्ये मंगळवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटने अचानक आग लागली. यात जिनींगमधील कपासाची गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. आग लागल्याचे लक्षात येताच त्वरित अग्निशमन दलाला पाचाराण करण्यात आले. मात्र तोपर्यंत सुमाराश १२ लाखांचा कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
अग्निशमन दलाने महत् प्रायासानंतर आग आटोक्यात आणली. या आगीत जिनींगमधील ३०० क्विंटल कापूस खाक झाला. त्याची किंमत १२ लाख रूपये होते, अशी माहिती जिनींग मालक किसन बजाज यांनी दिली.